-
फोन कॉल्स वरून जे फ्रॉड्स केले जातात त्याला तांत्रिक भाषेत व्हिशिंग (व्हॉइस फिशिंग) असं संबोधलं जातं. सामान्यतः जर फक्त सेल्युलर कॉल असेल (विना इंटरनेटचा वापर करून) तर आपला फोन हॅक होणं, खात्यातून पैसे जाणं या शक्यता जवळजवळ धूसर आहेत. परंतु आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून कॉल आला असेल तर असे करणे काही प्रमाणात शक्य आहे, कारण हा कॉल व्हीओआयपी या तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केलेला असतो ज्यात इंटरनेट डेटा आणि तुमचा आवाज हे एकाच चॅनेलमधून पाठवले जातात. परंतु असे फ्रॉड्स नक्कीच काही गोष्टींची काळजी घेतली तर रोखता येऊ शकतात. याचसंदर्भातील काही महत्वाच्या टीप्स या फोटोगॅलरीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल जोशी या तरुणाने दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अगदी साध्या सोप्या टीप्स ज्यामुळे तुम्ही मोबाईलवरुन होणाऱ्या फसवणूकीपासून सुरक्षित राहू शकता…
-
१. ९१ किंवा ० ने सुरु होणारा नंबर हा भारतीय असतो तर १४० ने सुरु होणारे नंबर हे टेलिमाकेर्टिंग कॉल्स असतात ह्या व्यतिरिक्त वेगळ्या आकड्यांनी सुरु होणारा नंबर असेल आणि आपल्याला त्याबद्दल खात्री नसेल तर शक्यतो कॉल नाही उचलला तरी चालेल. जर आपले नातेवाईक परदेशस्थित असतील आणि आपल्याला इंटरनॅशल कॉल्स येणे अपेक्षित असेल, तरीही इंटरनॅशल मिस्ड कॉल्स ना शक्यतो खात्री केल्याशिवाय कॉलबॅक करू नका कारण काही प्रीमियम नंबर्स द्वारे आपल्यालाच उलट बिल येऊ शकते.
-
२. कोणतीही बँक, किंवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था आपली आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती जसे की, अकाउंट नंबर. पासवर्ड, ओटीपी. सीव्हीव्ही नंबर हे कॉलद्वारे मागवत नाही त्यामुळे अशी माहिती कधीच कोणत्याही कॉलद्वारे देऊ नये.
-
३. कोणत्याही संस्थेचं किंवा अप्लिकेशनच केवायसी करण्यासाठी कॉल आल्यास आपला ओटीपी किंवा त्यांनी जर आपल्याला रिमोट ऍक्सेस अप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले तर तसे करू नये.
-
४. कोणताही फोन कॉल सुरु असतांना त्याच हँडसेट वरून इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करू नयेत, तर ते कॉल संपल्यावर किंवा अन्य डिव्हाइसवरून करावेत.
-
५. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला फोन कॉल सुरु असतांना एखादी वेब लिंक पाठवली तर तिच्यावर थेट क्लिक न करता प्रथम त्या लिंक ची योग्य शहानिशा करून घ्यावी, त्याचप्रमाणे कोणत्याही बँकेची वेबसाईट ऍक्सेस करतांना वेबलिंक वर क्लिक करून न जाता लिंक स्वतः टाईप करून जाणेच सुरक्षित ठरते.
-
-
७. फोन कॉलद्वारे आपल्या खात्यात अमुक एक रक्कम जमा करायची आहे अशी बतावणी करणारा कोणी असल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये आणि त्याला आपला युपीआय आयडी / पिन किंवा अकाउंट नंबर देऊ नये. लक्षात ठेवा युपीआय आयडी / पिन हा फक्त पैसे पाठवायच्या वेळी लागतो स्वीकारताना नाही.
-
८. फोन कॉल्सद्वारे अनोळखी व्यक्तीने एखादे अप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगितले तर त्यावर राजिस्टर करू नये, कारण त्या अप्लिकेशनद्वारे तिऱ्हाईत व्यक्ती आपल्या फोन मधील माहिती चोरण्याची शक्यता असते.
-
९. फोनद्वारे इंटरव्यू कॉल्स स्वीकारताना, आपल्या ओळखपत्राबाबात जसे की पॅन कार्ड, आधारकार्ड ह्याबाबतची माहिती देऊ नये किंवा कोणत्याही लिंक वर जाऊन खात्री केल्याशिवाय नोंदणी देखील करू नये.
-
१०. आपल्या फोन ची ऑपरेटिंग सिस्टीम आणि इंटरनेटद्वारे कॉल्स करू शकणारी अप्लिकेशन्स ही अद्ययावत ठेवावीत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल