-
हल्ली घरात वायफाय असणे ही एकप्रकारची गरज झाली आहे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि त्यांचा इंटरनेटचा वापर हे पाहता वायफाय घेणे परवडते.
-
मोबाईल, लॅपटॉप तसेच नोटबुक यांसारख्या उपकरणांवर वायफाय अॅक्सेस मिळवला जातो. या वायफायचा स्पीड बऱ्याचदा कमी होतो आणि मग आपली चिडचिड होते.
-
पुरेसे पैसे भरुनही इंटरनेट वापरण्यात अडचणी येत असल्याने काय करावे आपल्याला कळत नाही.
-
पण आपल्याला वायफायचा चांगला स्पीड मिळवायचा असेल तर काही सोप्या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.
-
राऊटर कधीच जमिनीवर ठेऊ नका, त्यामुळे सिग्नल जमिनीकडे जातो आणि आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना तो सिग्नल योग्य पद्धतीने मिळू शकत नाही.
-
वायफायचा राऊटर कॉम्प्युटरच्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याला चांगला स्पीड मिळेल अशी काहींची धारणा असते. मात्र ती चुकीची आहे. टीव्ही, फ्रीज किंवा कॉम्प्युटर यांच्या जवळ राऊटर ठेवल्याने सिग्नल कमी होतो.
-
त्यामुळे वायफायच्या बाजूला इलेक्ट्रीकची वस्तू असणार नाही याची काळजी घ्या.
-
राऊटर खराब होऊ नये म्हणून काही जण तो कपाटात किंवा बंद ठिकाणी ठेवतात. धूळ, पाणी आणि इतर गोष्टींपासून राऊटरला नुकसान होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र तसे न करता राऊटर एखाद्या उंच ठिकाणी ठेवावा.
-
तुमच्या राऊटरला अॅंटीना असतील तर त्या योग्य दिशेत राहतील याची काळजी घ्यायला हवी. दोन अँटीनांपैकी एक अँटीना सरळ तर दुसरी डावीकडे आडवी असावी. त्यामुळे तुम्हाला निश्चितच चांगला स्पीड मिळू शकतो.
-
सामान्यपणे राऊटरची रेंज १०० फूटांपर्यंत असते. त्यामुळे तो कुठे ठेवला आहे हे रेंज मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. राऊटर घराच्या मध्यभागी ठेवल्यास घरात सगळीकडे योग्य पद्धतीने रेंज मिळेल.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…