-
एकेकाळी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) सेगमेंटमध्ये पहिली असणारी महिंद्रा कंपनी बाजारात पुन्हा एकदा आपली उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने बाजारात आपली नवीन XUV700 बाजारात आणली आहे.
-
महिंद्रा कंपनीला ह्युंदाई, किया आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांना मागे टाकून एसयूव्ही बाजारातील आपले गमावलेले स्थान परत मिळवायचे आहे.
-
या कारचे बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे.
-
महिंद्रा अँड महिंद्रा ने मंगळवारी आपल्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) महिंद्रा एक्सयूव्ही ७०० च्या दोन नवीन एडीशन बाजारात आणण्याची घोषणा केली जी डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि स्वयंचलित दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.
-
केवळ दोन दिवसांत तब्बल ५० हजार XUV700ची विक्री झाली आहे. महिंद्रा ग्रूपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
-
AX7 व्हेरिएंट एक पर्याय लक्झरी पॅकसह उपलब्ध असेल. सोनी सपोर्टिंग इमर्सिव्ह ३ डी साउंड, स्मार्ट डोअर हँडल्स, ३६ डिग्री साराउंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक, ड्रायव्हर एअरबॅग, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सतत डिजिटल व्हिडीओ लक्झरी पॅकमध्ये उपलब्ध असतील.
-
यामध्ये कंपनीने एकूण ७ एअरबॅग दिल्या आहेत. बरीचशी, ही एसयूव्ही फक्त ५ सेकंदात शून्यावरून ६० किलोमीटर प्रति तास वेग पकडते.
-
एसयूव्हीमध्ये रेकॉर्डिंग आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे
-
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही एसयूव्ही खूप मजबूत आहे.
-
एम अँड एम लिमिटेडने एका प्रकाशनात म्हटले आहे की, दोन नवीन ७ -सीटर आवृत्त्या – AX7 लक्झरी – MT आणि AX7 लक्झरी – AT + AWD (ऑल -व्हील ड्राइव्ह) ची किंमत अनुक्रमे १९.९९ लाख आणि २२.८९ लाख रुपये आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. (सर्व फोटो:financial express)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख