-
मुंबईमधील लालबाग परिसरामधील अगदी प्राइम ठिकाणी असलेल्या वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलला यश आलं.
-
अग्निशामन दलाच्या १५ गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ही इमारत तिच्या अवाढव्या आकारामुळे चांगलीच परिचयाची आहे.
-
लालबागमधील भारतामाता या आयकॉनिक थेअटर समोर असणारी ही इमारत ६० मजल्यांची आहे.
-
मुंबईत सर्वात आलिशान फ्लॅट्स असणाऱ्या मोजक्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश होतो. या इमारतीमध्ये किमान थ्री बीएचकेचे फ्लॅट्स आहेत.
-
रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.
-
आग लागल्यामुळे चर्चेत आलेल्या या इमारतीलमधील सर्व घरं ही आलीशान म्हणजेच किमान थ्री बीएचकेची आहेत. या घरांची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण त्याआधी या इमारतीमध्ये काय काय सुविधा म्हणजेच अॅमिनिटज देण्यात आल्यात ते पाहूयात…
-
इमरातीमध्ये मोठ्या आकाराचा कॅफेटेरिया आहे.
-
इमरातीमध्ये मोठ्या आकाराचा स्विमिंग पूलही आहे.
-
रात्रीच्यावेळी हा पूल असा दिसतो.
-
इमारतीत लॅप पूलचीही सोय देण्यात आलीय.
-
स्वीमींग पूलला लागूनच असलेले हे वेटींग केबीन्स
-
तरुण तसेल लहान मुलांसाठी अनेक सोयी या इमारतीमध्ये आहेत.
-
हा टीनएज म्हणजे वयात आलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आलेला खास रुम
-
मुव्ही अंडर द स्काय नावाअंतर्गत असं छोट्या मुलांसाठीचं थेअटरही या इमारतीत आहे.
-
लहान मुलांसाठीची मोठा इनडोअर प्लेइंग एरिया,
-
मोठ्यांसाठीही अनेक इनडोअर गेम्ससाठी वेगवेगळे सेक्शनस देण्यात आलेत. हा कॅरम सेक्शन.
-
याचप्रमाणे चेस रुम सुद्धा येथे आहे.
-
पत्ते खेळणाऱ्यांसाठी विशेष कार्ड रुमची सोय करण्यात आलीय.
-
टेबल टेनिससाठीही या ठिकाणी सोय आहे.
-
ही क्वॅश रुम
-
मोठा पूल बोर्डही या इमारतीमधील राहिवाशांसाठी देण्यात आलाय.
-
एक मोठी लायब्रेरीसुद्धा या इमारतीमध्ये आहे.
-
टेनिस, बास्केटबॉल कोर्टही या इमारतीमध्ये आहे.
-
क्रिकेट आणि फूटबॉलसाठी विशेष सोय येथील एका मजल्यावर करण्यात आलीय.
-
जॉगिंग ट्रॅकचीही सुविधा येथे देण्यात आलीय.
-
येथील हेल्थ सेंटरमध्येही अनेक गोष्टींचा समावेश आहे. हा फोटो जीमचा.
-
या ठिकाणी स्पाची सुविधाही देण्यात आलीय.
-
सॅलॉनची सुविधाही इमारतीच्या आवारामध्येच आहे.
-
इमारतीमध्ये खासगी थेअटर आहे.
-
इमारतीखाली गप्पा मारण्यासाठी, बसण्यासाठी बरीच ऐसपैस जागा आहे.
-
आता ऐवढ्या साऱ्या सुविधा पाहून तुम्हाला या घरांची किंमत किती असा प्रश्न पडला असणार.
-
घर खरेदी विक्रीसंदर्भातील मॅजिक ब्रिक्स या वेबसाईटवरील माहितीनुसार या इमारतीमधील थ्री बीएचके घरांचा एरिया दोन हजार स्वेअर फुटांचा आहे.
-
यामध्ये तीन बाथरुमचाही समावेश आहे. या थ्री बीएचके घरांची किंमत ४ कोटींपासून सुरु होते.
-
लक्झरी थ्री बीएचके फ्लॅट १२ कोटींच्या पुढेच आहे. फोर बीएचकेची किंमत ही ७ कोटींपासून सुरु होते.
-
थ्री बीएचकेप्रमाणेच लक्झरी फोर बीएचकेही मूळ किंमतींपेक्षा अधिक दराला उपलब्ध आहेत. यामध्ये प्लोअर राईज आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यास किंमत वाढते.
-
९९ एकर्स या वेबसाईटवरील माहितीनुसार या इमारतीमधील फाइव्ह बीएचके फ्लॅट्स हे ६६०० स्वेअर फुटांचे आहेत. या मध्ये पाच बेडरुम आणि पाच बाथरुम आहेत.
-
या घरांचा दर ८० हजार ३०३ रुपये प्रती स्वेअर फूट इतका आहे. त्यामुळेच पाच बीएचके घराची किंम ५३ कोटी रुपये इतकी आहे.
-
असं असलं तरी आगीच्या घटनेनंतर आता या इमारतीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
-
अनेकांनी आगीच्या घटनेनंतर बिल्डरने फसवणूक केली असून सांगितलेल्या सर्व सुविधा दिल्या नाहीत, पाणी येत नाही यासारख्या तक्रारी पालिका आयुक्तांकडे केल्यात. (सर्व फोटो अविघ्न ग्रुप आणि ट्विटरवरुन साभार)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’