-
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा असं केलं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
-
फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. पण या मेटाचा अर्थ काय होतो?
-
किंवा हे नाव बदलल्यानंतर आता अनेक युझर्सला असा प्रश्न पडला आहे की त्यांच्या मोबाईलमधील फेसबुक अॅपचं आणि साईटचंही नाव बदलणार आहे का?
-
फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, या साऱ्याचा युझर म्हणून आपल्यावर काय परिणाम होणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
-
याच प्रश्नाचं उत्तरं, फेसबुकने नक्की काय आणि कसा बदल केलाय, मेटाचा अर्थ काय? कोणी या पूर्वी असं केलं होतं का… हे सारं आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे.
-
नावच नाही लोगोही बदलला > केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे.
-
आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे.
-
या चिन्हामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
-
मेटाव्हर्सच्या दिशेने पाऊल > झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे.
-
फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल, असं झुकरबर्गने घोषित करताना कंपनी मेटाव्हर्सच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचं म्हटलं आहे.
-
मेटाव्हर्स म्हणजे काय > मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका.
-
इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो.
-
डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.
-
स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.
मेटा या ब्रॅण्डनेमअंतर्गत प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये काम केलं जाईल. पहिलं म्हणजे सध्या ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचं आणि दुसरं भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधनासंदर्भातील असणार असं झुकरबर्गने म्हटलं आहे. -
फेसबुकचं नाव बदलणार का? > मात्र कंपनी केवळ आपलं मूळ नाव बदलत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळेच फेसबुक या प्लॅटफॉर्मचं नाव बदललं जाणार नाही.
उदाहरण द्यायचं झालं तर टाटा समूह हा उद्योगसमूह असून त्याच्या अंतर्गत टाटा स्टील्स, टाटा मोटर्स अशा अनेक उपकंपन्या आहेत. तसेच आता फेसबुकचं होणार आहे. -
त्याचप्रमाणे आजपर्यंत फेसबुक या नावाखाली फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश होत होता.
-
मात्र आता या सर्व कंपन्या मेटा या नावाखालील मोठ्या कंपनीच्या अंतर्गत असतील असा या नाव बदलाचा सरळ अर्थ होतो. म्हणजेच युझर्सच्या मोबाईलमधील फेसबुक हे अॅप किंवा साईटचं नाव बदललं जाणार नाही.
-
गुगलचंही हेच झालं… > अगदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उदाहरण द्यायचं झालं तर गुगलचं उदाहरण देता येईल. अल्फाबेट ही कंपनी गुगलची मूळ कंपनी आहे हे तुम्हाला माहितीय का.
-
मूळ कंपनी अल्फाबेट असली तरी गुगलला गुगल याच नावाने ओळखलं जातं.
-
अल्फाबेट आयएनसी या कंपनीचं रिब्रॅण्डींग २ ऑक्टोबर २०१५ ला करण्यात आलेलं. ही कंपनी गुगलची पॅरेंट कंपनी म्हणजेच मूळ कंपनी झाली.
-
या कंपनीअंतर्गत आता गुगलपासून अन्य वेगवेगळ्या कंपन्या उपकंपन्या म्हणून काम करतात. तसेच आता फेसबुकचे होणार आहे. कागदोपत्री मेटा कंपनीच्या अंतर्गत फेसबुक काम करेल पण त्याची ओळख मात्र पुसली जाणार नाही.
-
फेसबुक फर्स्ट धोरण रद्द > हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे.
-
अगदी साध्या शब्दात सांगायचं झाल्यास फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही मोठा परिणाम होणार नाहीय.
-
या पुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत. यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
-
मेटा हा शब्द ग्रीक भाषेतून आलेले आहे. त्याला अर्थ पलिकडे म्हणजेच इंग्रजीत beyond असा होता.
-
मला वाटतं की हा शब्द अगदी योग्य पद्धतीने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कायमच नवीन गोष्टींच्या शक्यता असतात असं स्पष्ट करतो.
-
त्यामुळेच फेसबुकच्या नावात झालेला बदल हा तांत्रिक मुद्दा असून सध्या तरी फेसबुकची सेवा आणि इतर अॅप वारणाऱ्यांना चिंता करण्याची गरज नाहीय. (सर्व फोटो : रॉयटर्स, फेसबुक, इंडियन एक्सप्रेस आणि मेटावरुन साभार)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही