-
ऑडी (Audi ) या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू ५ (Audi Q5 ) च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी फीचर्स आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. (Express photo and Video by Pradip Das)
-
ऑडी क्यू ५ मध्ये, २४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती आहे. (Express photo and Video by Pradip Das)
-
औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू ५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,०००/- रुपये आणि ६३,७७,०००/- रुपये आहे.(Express photo and Video by Pradip Das)
-
२४९ हॉर्सपॉवर शक्ती व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर ४५ टीएफएसआय इंजिनची शक्ती ऑडी क्यू५ मध्ये आहे.(Express photo and Video by Pradip Das)
-
कारचा वेग केवळ ६.३ सेकंदात शून्यावरून १०० किलोमीटरपर्यंत जातो आणि २३७ किलोमीटर प्रतितास एवढा सर्वोच्च वेग गाठू शकते. (Express photo and Video by Pradip Das)
-
ऑडी ड्राइव्ह सिलेक्टच्या माध्यमातून ड्रायव्हर कंफर्ट, डायनॅमिक, इंडिव्हिज्युअल, ऑटो, एफिशिएन्सी आणि ऑफ-रोड या सहा मोड्समधून एकाची निवड करू शकतो. (Express photo and Video by Pradip Das)
-
क्वात्रो फोर-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये सुयोग्य पकड मिळवण्यास मदत होते.(Photo: financial express) ( हे ही वाचा:2021 Audi Q5 Facelift: भारतात लाँच! मर्सिडीज GLC, BMW X3 ला देणार टक्कर )
-
ऑडी क्यू ५ च्या पुढील बाजूला ट्रेडमार्ड सिंगलफ्रेम ग्रिल अष्टकोनी आउटलाइनसह देण्यात आली आहे, ही रचना अधिक सुस्पष्ट आहे आणि यात कडा अधिक स्पष्ट दिसून येतात. (Photo: financial express)
-
ऑडी क्यू ५ पुढील पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – नॅव्हारा ब्ल्यू, आयबिस व्हाइट, मायथोस ब्लॅक, फ्लोरेट सिल्व्हर आणि मॅनहटन ग्रे. (Photo: financial express)
-
नवीन ऑडी क्यू५ ची अंतर्गत रचना अटलास बेज व ओकापी ब्राउन रंगातील लेदर लेदरेट अपहोल्स्ट्रीने सजली आहे, तर इनलेजचे फिनिशिंग पिआनो ब्लॅक रंगात केले आहे. (Photo: financial express)
-
सेन्सॉर-कंट्रोल्ड बूट लिड ऑपरेशन, पार्किंग एड प्लससह पार्क असिस्ट, ड्रायव्हर मेमरीसह पॉवर फ्रण्ट सीट्स तसेच वायरलेस चार्जिंग सुविधेसह ऑडी फोन बॉक्स यांमुळे प्रवास अत्यंत आरामदायी होईल याची निश्चिती होते. (Express photo and Video by Pradip Das)

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO