-
ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजे सीईओ पदाचा पदभार पराग अग्रवाल स्वीकारणार आहेत. ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांची जागा पराग अग्रवाल घेणार असल्याची घोषणा सोमवारी केलीय.
-
मुंबई आयआयटीमधील विद्यार्थी ते ट्विटरचे सीईओ असा पराग अग्रवाल यांचा प्रवास थक्क करणार आहे. मात्र तितकाच थक्क करणारा आता त्यांचा पगाराचा आकडाही आहे.
-
या गॅलरीमधून आपण अग्रवाल यांच्याबद्दलच्या खास गोष्टी आणि सीईओ झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल तसेच इतर रक्कमेबद्दल जाणून घेणार आहोत.
-
ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
-
आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं.
-
पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत. पराग हे ट्विटरचे पहिली इंजिनियर ठरले ज्यांनी अगदी रेव्हेन्यूपासून कस्टमर इंजिनियरिंगपर्यंतच्या सर्व विभागांमध्ये काम केलं आहे.
-
ट्विटरला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यात आणि २०१६-२०१७ दरम्यान मोठ्या संख्येने युझर्सला स्वत:कडे आकर्षित करण्यात ट्विटरला जे यश मिळालं त्यात पराग यांचा मोठा वाटा आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळेच दहा वर्षांच्या या मेहनतीचं फळं आता पराग यांना सीईओ पदाच्या रुपाने मिळणार आहे.
-
२०१७ मध्ये पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या ‘सीटीओ’पदी नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत.
-
सीटीओ पदी नियुक्त झाल्यापासून पराग यांच्यावर कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि सुधारणांसदर्भातील निर्णयांचे प्रमुख आहेत. तेथे त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे कंपनीला चांगलं यश मिळाल्याचं पहायला मिळालं.
-
२०१९ मध्ये जॅक यांनी पराग यांना प्रोजेक्ट ब्ल्यूस्कायचे प्रमुख पद दिलं. ट्विटरवरील चुकीच्या माहितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओपन सोर्स पद्धतीने ब्ल्यूस्काय प्रकल्प सुरु करण्यात आलेला. २९ नोव्हेबर २०२१ रोजी पराग कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील असं जाहीर करण्यात आलं.
-
पद आणि जबाबदारी वाढवण्याबरोबरच पराग यांच्या पगारामध्येही घसघशीत वाढ होणार आहे. पगाराच्या आकड्यांसंदर्भातील माहिती आता पुढे आलीय.
-
अग्रवाल यांना वर्षाला किती पगार दिला जाणार आहे यासंदर्भातील घोषणा ट्विटरने केली आहे. अग्रवाल यांचा वार्षिक पगार १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ साडेसात कोटी रुपये इतका असणार आहे. मात्र ही रक्कमही कमी वाटावी अशी एक रक्कमही पराग यांना सीईओ म्हणून दिली जाणार आहे.
-
याशिवाय अग्रवाल यांना बोनसही मिळणार असल्याची माहिती ट्विटरने अमेरिकेतील आर्थिक संस्थांना माहिती देताना दिलीय.
-
पगाराबरोबरच अग्रवाल यांना कंपनीचे मर्यादित प्रमाणातील स्टॉक्सही मिळणार असून त्यांची किंमत १२.५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ९३ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.
-
ही ९३ कोटी ९० लाखांची रक्कम अग्रवाल यांना १६ तुकड्यांमध्ये मिळणार असून ती दर तिमाहीला टप्प्याटप्प्यात जमा केली जाणार आहे. हे पैसे फेब्रुवारी २०२२ पासून अग्रवाल यांच्या खात्यावर जमा होतील. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल