-
सध्या केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये इलेक्ट्रीक कार्सची मागणी वाढताना दिसत आहेत. स्वस्तात मस्त इलेक्ट्रीक कार्सला ग्राहक प्राधान्य देत असल्याचं लक्षात घेतच टोयोटा कंपनीने भारतातील टाटा नॅनोपेक्षाही छोट्या आकाराची चारचाकी गाडी बाजारात आणलीय.
-
आरामदायक, किफायतशीर आणि स्टायलिश अशी टोयोटा सी प्लस पॉड (Toyota C+pod) ही गाडी नुकतीच जपानमधील ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलीय. डिसेंबर २०२० पासून ही गाडी जपानमधील कार्परेट कंपन्या आणि महापालिकांना विकल्या जात होत्या. मात्र आता त्या जपानी लोकांनाही खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्यात.
-
नवीन सी प्लस पॉड ही गाडी सध्या तिच्या आकारामुळे आणि मायलेजमुळे जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या गाडीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले असून तिचे फिचर्स आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता वाढल्याचं चित्र दिसत आहे. चला तर पाहुयात कशी आहे ही गाडी आणि काय आहेत तिचे फिचर्स…
-
सी प्लस पॉड ही पर्यावरणस्नेही टू सीटर इलेक्ट्रीक कार आहे. शहरांमधील किफायतशीर मोबिलिटी ऑप्शन म्हणून ही गाडी डिझाइन करण्यात आली आहे.
-
प्रत्येक व्यक्तीमागे खर्च होणारी ऊर्जा आणि इंधन यामध्ये बचत करता यावी या मूळ हेतूने आणि शहरामध्ये अगदी छोट्याश्या जागेत मावेल अशी आणि चांगलं मायलेज देणारी गाडी म्हणून सी प्लस पॉड विकसित करण्यात आलीय.
-
सी प्लस पॉड ही तीन टोन कलर्समध्ये उपलब्ध आहे. यात ब्लॅक आणि व्हाइट, ब्लू आणि ब्लॅक तसेच ऑरेंज आणि ब्लॅक असे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेत.
-
९.०६ किलो व्हॅटच्या लिथिम आर्यन बॅटरीवर सी प्लस पॉड गाडी चालते. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल १५० किलोमीटरपर्यंत चालते असा दावा टोयोटाने केलाय.
-
या चिमुकल्या गाडीचा सर्वोच्च वेग हा ६० किमी प्रतितास इतका आहे.
-
छोट्या आकारामुळे ही गाडी सहज पार्क करता येणं शक्य आहे. तसेच ही गाडी जास्त वाहतूककोंडी असणाऱ्या शहरांमध्ये चांगला पर्याय ठरु शकते.
-
या सी प्लस पॉड गाडीची लांबी दोन हजार ४९० मिलीमीटर इतकी असून रुंदी एक हजार २९० मिलीमीटर इतकी आहे.
-
म्हणजेच सी प्लस पॉडही नॅनोपेक्षाही आकाराने छोटी आहे. नॅनोची लांबी तीन हजार १६४ मिलीमीटर असून रुंदी १ हजार ७५० मिलीमीटर आहे.
-
सी प्लस पॉड तिच्या छोट्या आकारामुळे अवघ्या ३.९ मीटरच्या त्रिज्येमध्ये जागेवर फिरु शकते.
-
२०० व्ही/१६ ए आउटलेटचा वापर करुन सी प्लस पॉड ही गाडी पाच तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. तर २०० व्ही/६ए च्या आउटलेटचा वापर करुन ही गाडी १६ तासांमध्ये चार्ज होते.
-
या गाडीला एलईडी हेड लाइट्स आणि एलईडी लेट लाइट्स देण्यात आल्यात. दोन्ही हेड लाइट्सच्या रांगेमध्येच मध्यभागी चार्जिंग इनलेट देण्यात आलं आहे. गाडीचं एक्सटीरियर पॅनल प्लास्टिकपासून बनवण्यात आल्याने गाडी वजनालाही फार हलकी आहे.
-
टोयोटाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ही गाडी जपानमध्ये १६ लाख ५० हजार जपानी येनला उपलब्ध आहे.
-
म्हणजेच भारतीय चलनानुसार या गाडीची किंमत १० लाख ७८ हजारांच्या आसपास आहे. मात्र ही गाडी जगभरातील इतर देशांमध्ये कधी आणि किती किंमतीत उपलब्ध होणार याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (सर्व फोटो टोयोटा आणि सोशल मीडियावरुन साभार)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा