-
पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आणि पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. सध्या देशात अनेक स्टार्टअप कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉंच केल्या आहेत.
-
आज आपण भारतातील लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कुटरबद्दल जाणून घेऊया.
-
एथर 450X : एथर एनर्जी ही देशातील पहिली इंटेलीजेंट इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक आहे. नव्या एथर 450X मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग, नेव्हिगेशन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे उत्तम फीचर्स आहेत. (Photo : atherenergy.com)
-
एथर 450X ची बॅटरी २.९ KWH ची आहे. ही इलेक्ट्रिक मोटर ८ बीएचपी पॉवर जनरेट करते. जुन्या मॉडेलपेक्षा ०.८ बीएचपी जास्त आहे. तसेच, त्याचे वजन जुन्या मॉडेलपेक्षा ११ किलो कमी आहे आणि त्याचा टॉप स्पीड देखील ताशी ८५ किमी इतका वाढला आहे. (Photo : atherenergy.com)
-
450X फक्त ३.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. एथर 450X मध्ये दोन राइडिंग मोड आहेत. ते एका पूर्ण चार्जवर इको मोडवर ११६ किमी आणि राइड मोडवर ८५ किमी अंतर कापू शकते. (Photo : atherenergy.com)
-
Ola S1 ची रेंज १२१ किमी आणि टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. दुसरीकडे, Ola S1 Pro ची रेंज 181 किमी आणि टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे असे म्हटले जाते. (Photo : olaelectric.com)
-
काळ, गुलाबी, पिवळा, निळा, पांढरा अशा एकूण १० कलर ऑप्शनमध्ये स्कूटर खरेदी करता येईल. (Photo : olaelectric.com)
-
TVS iQube ची रेंज 75Km आहे, TVS iQube ४.२ सेकंदात ० ते ४० kmph ची स्पीड वाढवू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड ७८ किमी प्रतितास आहे. चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात. (Photo : tvsmotor.com)
-
iQube वरील हेडलॅम्प पुढील ऍप्रनमध्ये स्थित आहे आणि LED दिवसा चालणारे दिवे मिळतात. (Photo : tvsmotor.com)
-
बजाज चेतक एका चार्जमध्ये ९० किमी पर्यंत चालवता येते. दुसरीकडे, बजाज चेतक इको मोडमध्ये ६० किमी प्रतितास वेगाने धावते. चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात. (Photo : chetak.com)
-
बजाज चेतक इलेक्ट्रिक रेट्रो स्टाइलिंगसह येते. यात गोल हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात, जे क्रोम बेझल्ससह येतात. (Photo : chetak.com)
-
Okinawa Oki 90 स्कूटरमध्ये रियर व्हील हब माउंटेड DC इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. ज्याला बॅटरीने पॉवर मिळते. (Photo : okinawascooters.com)
-
ही सिंगल चार्जमध्ये १५० किमी पर्यंत रेंज ऑफर करते. याची टॉप स्पीड ९० किमी प्रति तास इतकी असू शकते. (Photo : okinawascooters.com)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”