-
तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि स्मार्ट गॅजेट्सचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला कोणत्याही स्मार्ट शूबद्दल विचारले तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल.
-
मात्र, नुकतंच Nike ने आपले स्मार्ट शूज लाँच केले आहेत. हे नायकी शू स्मार्ट आणि पूर्णपणे स्वयंचलित आहे.
-
नायकीचे हे शूज लेसला रोबोटप्रमाणे बांधतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.
-
या नायकी शूचे नाव आहे Adapt BB. दिसण्याच्या बाबतीत, ते बास्केटबॉल शूसारखे आहे.
-
जर तुम्ही बास्केटबॉल खेळाडू असाल तर हे तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत.
-
या बुटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्यावर आपोआप लेसेस बांधले जातात.
-
Nike Adapt BB रक्तदाब सांगण्यास देखील सक्षम आहे.
-
याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान करून तुम्ही चालत असाल आणि तुमचे पाय सुजले तर हा शू तुमच्या रक्तदाबानुसार आपोआप अॅडजस्ट होईल. हे शू गरजेनुसार घट्ट आणि सैल होतात.
-
तुम्ही अॅपच्या माध्यमातून या शूला पूर्णपणे नियंत्रित करू शकता.
-
याआधी नायकीने Nike + iPod आणि Nike + Training सारखे स्मार्ट शूज सादर केले आहेत जे लोकांनाही आवडले आहेत.
-
Nike Adapt BB भारतात लॉंच करण्याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.
-
सर्व फोटो : nike.com

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश