-
अॅपलने नुकतेच स्प्रिंग इव्हेंट दरम्यान आयफोन एस ई ३ ( i phone SE 3), आयपॅड एअर (iPad Air) आणि आणि मॅक स्टुडिओ (Mac Studio) सोबत नवीन हिरव्या रंगातील आयफोन १३ (iPhone 13) ची घोषणा केली आहे. सध्या या रंगातील आयफोनला खूप मागणी आहे. म्हणून, जर तुम्हाला तुमचा जुना आयफोन १३ विकून हिरव्या रंगाचा आयफोन मिळवायचा असेल तर तो अशा प्रकारे मिळवू शकता.
-
आयफोन १३ प्रो (iPhone 13 Pro) आयफोन १३ मिनी (iPhone 13 Mini), आयफोन १२ प्रो (iPhone 12 Pro), आयफोन १२ प्रो मॅक्स (iPhone 12 Pro Max), आयफोन १२ मिनी (iPhone 12 Mini) आणि आयफोन एस ई ३ (iPhone SE 3) किंवा आयफोन एस ई २०२२ (iPhone SE 2022) यासह सर्व आयफोन मॉडेल्स वर भारत आयस्टोरकडून समान कॅशबॅक आणि एक्सचेंज इन्सेन्टिव्हसाठी देण्यात आल्या आहेत.
-
ही सूट केवळ हिरव्या आयफोन १३ (iPhone 13) पुरता मर्यादित नाही. या सवलती सर्व रंगांमधील आयफोनवर लागू होतात. अॅपल इंडिया रिसेलरवर टॉप-ऑफ-द-लाइन आय फोन १३ प्रो मॅक्स (iPhone 13 Pro Max) वर देखील सवलत दिली जाते. ग्राहकांना (iPhone 13 Pro Max) १ लाख ८ हजार ८०० रुपयांना मिळतो.
-
यावर एचडीएफसी (HDFC) बॅंकेच्या कार्ड खरेदीवर ३ हजारांची सूट देण्यात आली आहे. तसेच १८ हजाराचे एक्सचेंज इन्सेंटिव्ह आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत १ लाख २९ हजार ९०० वरून १ लाख ८ हजार ९०० वर पोहचली आहे.
-
या व्यतिरिक्त, अॅपल पुनर्विक्रेत्याकडे एक एक्सचेंज ऑफर आहे. जिथे तुम्ही तुमच्या मागील स्मार्टफोनची किंमत आणखी कमी करण्यासाठी विकू शकता.
-
इंडिया आयस्टोरवर उत्कृष्ट कंडिशन असलेल्या आयफोन एक्सआरा (iPhone XR) ची किंमत १८,००० आहे, ज्यामुळे आयफोन १३ (iPhone 13) ची प्रभावी किंमत ५२,९०० रु. पर्यंत कमी झाली आहे.
-
वापरकर्त्यांनी त्यांच्या मोबाईलबद्दल अचूक माहिती पुरवणे बंधनकारक आहे. कारण केवळ जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर ही किंमत आधारित असेल.
-
आयस्टोर इंडिया आयफोन १३ वर रु. ५,००० इन्स्टंट स्टोअर डिस्काउंट ऑफर करत आहे, ज्याची किंमत रु. ७९,००० वरून ७४,००० पर्यंत खाली आणली आहे
-
याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना ४,००० रुपयांचा कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे आयफोन १३ (iPhone 13) ची एकूण किंमत ७०,९०० रुपयांपर्यंत पोहचेल.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा