-
देशात गरमीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांच्या घामाच्या धारा लागल्या आहेत.
-
एसी-कुलर लोकांना दिलासा देत असले तरी नंतर येणारे वीज बिल मात्र टेन्शन देत आहे.
-
मात्र आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.
-
यामध्ये तुम्हाला एसी चालवावा लागणार नाही आणि उष्णतेमध्येही राहावे लागणार नाही. आपण फक्त थोडे सावध असणे आवश्यक आहे.
-
आज आपण अशा टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे आपले वीज बिल कमी होऊ शकते.
-
उन्हाळ्यात एसीपेक्षा सीलिंग आणि टेबल फॅनचा जास्त वापर करा. त्याची किंमत ३० पैसे प्रति तास आहे, तर एसी १० रुपये प्रति तास चालतो.
-
जर तुम्हाला एअर कंडिशन चालवायचे असेल तर २५ डिग्रीवर चालवा. यामुळे विजेचा वापरही कमी होईल. तसेच ज्या खोलीत एसी चालू आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद करा.
-
फ्रीजवर किंवा त्याच्या जवळ मायक्रोवेव्हसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. याचा परिणाम जास्त वीज वापरावर होतो.
-
फ्रीज थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. रेफ्रिजरेटरभोवती हवेच्या प्रवाहासाठी पुरेशी जागा द्या.
-
फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवू नका. ते आधी थंड होऊ द्या.
-
संगणक आणि टीव्ही यांचा वापर करून झाल्यावर वीज बंद करा. मॉनिटरला स्पीड मोडमध्ये ठेवा.
-
फोन आणि कॅमेरा चार्जर वापरल्यानंतर, तो प्लगमधून अनप्लग करा. प्लग इन ठेवल्यावर, जास्त वीज वापरली जाते.
-
एलईडी लाइट कमी वीज वापरतो आणि चांगला प्रकाश देखील देतो.
-
त्याच वेळी, तुम्ही ५ स्टार रेटिंगसह उर्वरित उपकरणे देखील घेऊ शकता. त्यातही तुमच्या विजेची बचत होईल.
-
सर्व फोटो : Indian Express, Pexels, Financial Express, Freepik
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…