-
नवीन ग्राहक जोडण्यात रिलायन्स जिओने पुन्हा एकदा अग्रेसर राहिली आहे.
-
एप्रिल महिन्यात १६.८ लाख नवीन ग्राहक जीओसोबत जोडले आहेत.
-
या नव्या ग्राहकांसोबतच जिओची ग्राहकसंख्या आता ४०.५ कोटींवर पोहोचली आहे, असे दूरसंचार नियामक – ‘ट्राय’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
-
जिओ पाठोपाठ एअरटेलच्या एकूण ग्राहक संख्येत ८.१ लाखांची भर पडली आहे.
-
एअरटेलची एकूण ग्राहक संख्या आता ३६.११ कोटी झाली आहे.
-
सर्वाधिक ग्राहकसंख्येच्या बाबतीत सध्या एअरटेलही जिओपेक्षा मागे असली तर दुसऱ्या स्थानावर भक्कमपणे उभी असल्याचं दिसतंय.
-
मात्र त्याचवेळी एप्रिल महिन्यात व्होडा-आयडियाला मोठा फटका बसलाय.
-
एप्रिलमध्ये व्होडा-आयडियाने १५.६८ लाख ग्राहक गमावले आहे.
-
व्होडा-आयडियाची एकूण ग्राहक संख्या त्यामुळे २५.९ कोटींपर्यंत खाली आली आहे.
-
एप्रिल अखेरीस भारतातील एकूण मोबाइलधारक ग्राहक ११४.३ कोटींवर गेले आहेत.
-
शहरी भागातील ग्राहकांची संख्या घटली असून ती आता ६२.४ कोटींवर आली आहे.
-
तर ग्रामीण भागातील ग्राहकांनी ५१.८ कोटींचा टप्पा गाठला आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”