-
शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे.
-
आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील हजारो शिवसैनिक दरवर्षी त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे.
-
यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले “आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत.”
-
दरवर्षी गुरूपोर्णिमेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आम्ही सगळेजण नतमस्तक होत असतो. गुरूपोर्णिमेला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात वेगळी भावना असते.
-
आज स्मृतीस्थळावर वंदन करताना आमच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा, भावना आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला.
-
बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे ५० आमदार करत आहेत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय.
-
राज्याचा सर्वांगीण विकास आमचं युती सरकार करेल. त्यामुळे शेतकरी, कामकरी, वारकरी, कष्ठकरी आणि सर्व समाज घटकांचा उत्कर्ष आणि राज्याचा विकास हेच आमचं ध्येय आहे.
-
“यानंतर आता मी धर्मवीर आनंद दीघे यांच्या शक्तीस्थळाला विनम्र आभिवादन करायला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिवसैनिक न चुकता ठेंभी नाक्यावर आनंद दीघे साहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. मी देखील जात आहे,” अशी माहितीही शिंदे यांनी दिली. (सर्व फोटो सौजन्य- CMO Maharashtra)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य