-
देशात अशी अनेक मंदिरं आहेत, जी विचित्र कारणांमुळे अनेकदा चर्चेत आली आहेत. यामध्ये काही मंदिरं महिलांच्या प्रवेशावर बंदी असल्याने चर्चेत आली आहेत. दरम्यान, काही मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवण्यात आली आहे. पण देशात अजूनही अनेक मंदिरे आहेत, जिथे महिलांना आत जाण्यास सक्त मनाई आहे.
-
आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील पटबौशी सत्रा मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. २०१० मध्ये काही महिलांनी या मंदिरात प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर या मंदिरात महिलांना पुन्हा बंदी घालण्यात आली.
-
राजस्थानमधील पुष्कर येथे भगवान कार्तिकेय मंदिर आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे. या मंदिरात देवाच्या ब्रह्मचारी रूपाची पूजा केली जाते, त्यामुळे महिलांना बंदी आहे, असं म्हटलं जातं.
-
कर्नाटकातील मंगळुरू येथील भगवान अनप्पा मंदिराच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, येथे महिला आणि लहान मुलांना प्रवेश बंदी आहे.
-
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील ऋषी ध्रूम आश्रम आणि मंदिर परिसरात महिलांना प्रवेशबंदी आहे. मात्र, एकदा स्थानिक आमदार मनीषा तेथे गेल्या होत्या. यानंतर आश्रमाशी संबंधित लोकांनी गंगाजलाने मंदिराचं शुद्धीकरण केलं होतं.
-
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रणकपूर जैन मंदिरात महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी नाही, मात्र मासिक पाळीच्या काळात महिलांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच येथे पाश्चिमात्य कपड्यांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही.
-
केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरात महिला पूजा करू शकतात, परंतु त्यांना गाभाऱ्यात प्रवेश करण्यास मनाई आहे.
-
आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरातील ‘भवानी दीक्षा मंडपम’ या दुर्गा देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नाही. (सर्व फोटो सौजन्य- एएनआय, जनसत्ता)

Ajit Pawar : पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर, म्हणाले…