-
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील हयात हॉटेलवर ‘अल कायदा’शी संबंध दहशतवादी संघटनेनं हल्ला केला आहे.
-
शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २० हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. तर ११७ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
-
सुमारे ३० तासांच्या चकमकीनंतर सशस्र दलांनी हयात हॉटेलमध्ये ओलीस ठेवलेल्या डझनभर लोकांची सुटका केली आहे.
-
सोमालियाचे आरोग्य मंत्री अली हाजी यांनी एसएनटीव्हीला सांगितलं की, “आम्ही आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची आणि ११७ जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.”
-
शुक्रवारी हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर सशस्र दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.
-
रविवारी सकाळी अन्य एका हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. संबंधित हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होता, त्याने सामान्य नागरिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला असता सशस्र दलांनी त्याला कंठस्नान घातलं.
-
हा हल्ला नेमक्या किती दहशतवाद्यांनी केला, हे अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती पोलीस अधिकारी हसन यांनी दिली.
-
या हल्ल्याची जबाबदारी अल शबाब या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. ही संघटना अल कायदाशी संबंधित असून ती मागील एक दशकापासून ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, केनिया आणि इथिओपिया सरकार पाडण्यासाठी लढा देत आहे.
-
संबंधित देशांत कट्टर इस्लामिक कायदा लागू करून आपली सत्ता स्थापन करणं, हा या दहशतवादी संघटनेचा हेतू आहे. (सर्व फोटो सौजन्य- रॉयटर्सवरून साभार)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली