-
व्हाटसऍप, फेसबुक मॅसेंजर आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म जगभरात जितके प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कमकुवत आहेत. या प्लॅटफॉर्मवर सध्या लोकांना गंडा घालण्याचा एका नवा मार्ग समोर आला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मीडिया रिपोर्टनुसार, काहींना अनोळखी नंबरवरून मॅसेज करून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले जाते. मात्र असे केल्यास युजरच्या वैयक्तिक माहितीला मोठा धोका होऊ शकतो. (फोटो: संग्रहित)
-
सहसा मुलींच्या नावे खोटे अकाउंट तयार करून हे मॅसेज केले जातात. मुलींच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर फॉलो करून मग व्हिडीओ कॉल करण्याचा मॅसेज केला जातो. (फोटो: संग्रहित)
-
जर का आपण हा व्हिडीओ कॉल केला तर समोर आपल्याला एक मुलगी दिसते, हळूहळू ती आपले कपडे उतरवते व कॉल ठेवण्याआधी स्क्रिनशॉट काढण्याबाबत विचारते. (फोटो: Financial Express)
-
स्किनशॉट काढताना ही मुलगी सुद्धा स्क्रीनमध्ये असते व इथूनच पुढे सुरु होते ब्लॅकमेलिंग! (फोटो: संग्रहित)
-
यानंतर तुम्हाला याच अकाउंटवरून मॅसेज करून पैसे मागितले जातात, जर का आपण पैसे देण्यास नकार दिला तर स्क्रिनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. (फोटो: Financial Express)
-
अनेकजणांनी आजवर बदनामीला घाबरून या अकाउंटला पैसे पाठवले आहेत. (फोटो: संग्रहित)
-
तुम्हाला अशा प्रकारचे मॅसेज आल्यास त्वरित हे अकाउंट ब्लॉक व रेस्ट्रिक्ट करा. इंस्टाग्राम अशा अनोळखी संशयित व्यक्ती फॉलो करत असतील तर त्यांना फॉलोवर्स मधून काढून टाका. (फोटो: संग्रहित)
-
जर आपल्याला असा अनुभव असेल तर थेट पोलिसांच्या सायबर सुरक्षा विभागाशी संपर्क साधा. (फोटो: Financial Express)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा