-
फर्स्ट जनरेशनचा सील न केलेला आयफोन अमेरिकेत एका लिलावात $35,000 (सुमारे २८ लाख) मध्ये विकला गेला आहे. (Image Source: Apple)
-
९ जानेवारी २००७ रोजी, अॅपलचे तत्कालीन सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील मॅकवर्ल्ड कॉन्फरन्समध्ये आयफोनचे अनावरण केले. (Image Source: AP)
-
हा फोन आयपॉड, कॅमेरा आणि वेब ब्राउझिंग क्षमतेसह टचस्क्रीन सारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे.
-
डिव्हाइसमध्ये टचस्क्रीन, २ MP कॅमेरा, व्हिज्युअल व्हॉइसमेल आणि वेब ब्राउझर आहे. (Image credit: Anuj Bhatia/Indian Express)
-
जून २००७ मध्ये आयफोन अमेरिकेत सादर करण्यात आला. (Wikicommons)
-
फोनच्या ४ GB मॉडेलची किंमत $४९९ आणि ८ GB मॉडेलची किंमत $५९९ होती. (Image Source: YouTube)
-
ZDNet च्या अहवालानुसार, आता पूर्णपणे पॅकेज केलेला मूळ iPhone (8GB) एका लिलावात $३५,४२४ मध्ये विकला गेला आहे.
-
ऑक्शन हाऊस आरआरने सांगितले की आयफोन बॉक्समध्ये १२ आयकॉनसह स्क्रीनवर आयफोनचे चित्र छापलेले आहे. (Photo: Amazon)
-
या लिलावात ७० हून अधिक वस्तूंवर बोली लावण्यात आली. (Photo: Freepik)
-
हे डिव्हाईस RR ऑक्शन्सच्या क्युरेट केलेल्या Apple, जॉब्स आणि कम्प्यूटर हार्डवेअर लिलावासाठी होते. (Photo: Amazon)
-
Apple-1 सर्किट बोर्ड देखील लिलावात दिसला, ज्याची $६७७,१९६ मध्ये विक्री झाली. (Photo: Freepik)
-
दरम्यान, Apple सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इतर डिव्हाईस आणि प्रोडक्टसह iPhone 14 सीरीज लॉंच करणार आहे. (Image credit: Jon Prosser/Front Page Tech)
-
याशिवाय फर्स्ट जनरेशनचा मूळ Apple iPod (5GB) लिलावात $२५,००० मध्ये विकला गेला, असे अहवालात म्हटले आहे. (Photo: Freepik)
-
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या मते, क्यूपर्टिनो-आधारित कंपनी ७ सप्टेंबर रोजी आपले नवीन डिव्हाईस सादर करू शकते. (Image Source: Apple)
-
आयफोन १४ लाँच होण्याआधी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर विद्यमान iPhone मॉडेल्सच्या किमतीत घट झाली आहे. (Image credit: ConceptsiPhone / YouTube / Screenshot)
-
अॅपल आयफोन १३ त्याच्या मूळ किमतीवर १७% सवलतीनंतर Amazon वर ६५,९९९ रूपयांच्या सवलतीच्या किंमतीवर लीस्ट झाला आहे. (Image Source: Apple)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता