-
मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक झाला आहे. बँकेच्या व्यवहारांपासून महिन्याचा किराणा खरेदी करण्यापर्यंत अनेक महत्वाची कामे आपण फोनवरच करतो.
-
अशावेळी दिवसभर फोन वापरल्याने चार्जिंग लगेच संपण्याची शक्यता असते. त्यामुळे चार्जिंगची व्यवस्था आधीच करावी लागते किंवा कोणत्याही उपलब्ध चार्जरने फोन चार्ज करावा लागतो.
-
पण कोणताही उपलब्ध चार्जर वापरणे किंवा चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करणे महागात पडू शकते. याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी फोन योग्य पद्धतीने चार्ज करणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.
-
अनेकजण रात्रभर मोबाईल चार्जला लावुन ठेवतात. असे केल्याने मोबाईलची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मोबाईल ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही मोबाईल रात्रभर चार्जला लावुन ठेऊ नये. (Photo : Indian Express)
-
मोबाईल चार्ज करताना नेहमी मोबाईलच्या ओरिजिनल चार्जरचा वापर करावा. जर कोणत्याही लोकल चार्जरचा वापर केला तर बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.
-
जर तुमच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल तर ती बदलण्यासाठी अनेक स्वस्तातल्या डुब्लिकेट बॅटरींचा पर्याय उपलब्ध असतो.
-
पण डुब्लिकेट बॅटरी वापरल्याने फोन ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर फोनची बॅटरी खराब झाली असेल तर ओरिजिनल बॅटरीच निवडावी.
-
बहुतांश वेळा मोबाईल विकत घेतल्यानंतर त्यासोबत चार्जर दिला जातो. पण काही कंपनींच्या मोबाईलसोबत चार्जर दिला जात नाही. अशावेळी मोबाईलच्या क्षमतेनुसार चार्जर निवडावा.
-
जर मोबाईलच्या क्षमतेनुसार चार्जर निवडला नाही तर मोबाईलच्या बॅटरीवर दबाव पडण्याची शक्यता असते. तसेच यामुळे फोनची प्रोसेसिंग स्पीड कमी होते.
-
कधीकधी कुटुंबातील सदस्य किंवा ऑफिसमधील सहकारी एकच चार्जर वापरतात. पण यामुळे चार्जर खराब होण्याची शक्यता असते.
-
एकदा जर चार्जर खराब झाला आणि त्याच चार्जरने फोन चार्ज केला तर त्यामुळे फोनदेखील खराब होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा चार्जर कोणासोबत शेअर करू नका किंवा कोणत्याही दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने तुमचा फोन चार्ज करू नका.
-
तज्ञांच्या मते फोन सतत चार्ज करू नये. कारण त्यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. बॅटरी २० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यावरच फोन चार्ज करावा. यामुळे बॅटरीवर दबाव पडणार नाही तसेच बॅटरी लवकर खराब होणार नाही. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ