-
भारत आणि जगातील बहुतेक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. हे प्रायमरी चॅटिंग अॅप म्हणून वापरले जाते.
-
यावर प्रत्येकजण आपल्या मित्रांसोबत अनेक खाजगी आणि गुप्त गोष्टी शेअर करत असतात.
-
पण, जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी चॅट करतो तेव्हा मात्र मोठी समस्या असते.
-
आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आपल्या फोनच्या स्क्रीनकडे पाहू लागते आणि आपले चॅट वाचू लागते.
-
पण, तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता.
-
येथे आम्ही तुम्हाला अशा अॅपबद्दल सांगत आहोत जे तुमच्या व्हॉट्सअॅपवर व्हर्च्युअल पडदा टाकेल.
-
ही ट्रिक वापरून शेजारी बसलेल्याला सुद्धा कळणार नाही की तुम्ही काय चॅटिंग करताय?
-
यासाठी, प्रथम तुम्हाला Google Play Store वर जाऊन तुमच्या Android वर MaskChat-Hides Chat अॅप इन्स्टॉल करावे लागेल.
-
यामध्ये तुम्हाला एड-फ्री अनुभवासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
-
हे तुमच्या चॅट्स लपवण्यात मदत करेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते तुमच्या WhatsApp वर डिजीटल पडदा टाकते.
-
यामुळे बाजुच्या व्यक्तीला तुमच्या फोनची स्क्रीन दिसत नाही.
-
याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय मित्रांशी चॅट करू शकता.
-
व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त, हे अॅप इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या इतर अॅप्सवर देखील काम करते.
-
म्हणजेच लोकप्रिय मेसेजिंग अॅप्समध्ये तुम्ही हे अॅप वापरू शकता.
-
हे सेटअप करणे देखील खूप सोपे आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या द्या.
-
अॅप ओपन होताच तुम्हाला स्क्रीनवर फ्लोटिंग मास्क आयकॉन दिसेल.
-
जेव्हा तुम्हाला स्क्रीन इतरांपासून लपवायची असेल तेव्हा ते चालू करण्यासाठी या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करा.
-
यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डिजीटल स्क्रीन किंवा वॉलपेपर दिसेल.
-
तुम्ही त्याचा फोटो किंवा आकार तुमच्यानुसार बदलू शकता. (All Photos : Freepik)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”