-
यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. येथे युजरला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
-
यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये येणाऱ्या नको असलेल्या जाहिराती.
-
पण आता काळजी करण्याची गरज नाही. अशी एक ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये येणाऱ्या जाहिराती ब्लॉक करू शकता.
-
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम उघडावे लागेल. यानंतर अॅडब्लॉकर एक्स्टेंशन क्रोम सर्च करा.
-
आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला AdBlock — best ad blocker — Google Chrome दिसेल. यावर क्लिक करा.
-
यानंतर पुन्हा एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये ‘अॅड टू क्रोम’ लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा.
-
त्यावर क्लिक केल्यावर एक फाईल डाउनलोड होईल. मग आपोआप इन्स्टॉलही होईल. तसे न झाल्यास, तुम्ही स्वतः इन्स्टॉल करू शकता.
-
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, क्रोम बंद करा. त्यानंतर ते पुन्हा उघडा.
-
त्यानंतर जेव्हा तुम्ही गुगल क्रोमचा युआरएल बार पाहाल तेव्हा तुम्हाला एक एक्सटेंशन दिसेल. यावर क्लिक करा.
-
येथे AdBlock-best ad blocker दिसेल. यावर क्लिक करा. असे केल्याने युट्यूबवर येणाऱ्या जाहिराती ब्लॉक होतील.
-
आता तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हिडिओ पाहण्यास सक्षम असाल.
-
यामध्ये युजर्स युट्यूबचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत.
-
जर तुम्हाला १ महिन्यासाठी युट्यूब प्रीमियमचे सदस्यत्व घ्यायचे असेल तर तुम्हाला १३९ रुपये खर्च करावे लागतील.
-
तीन महिन्यांसाठी ३९९ रुपये आणि १२ महिन्यांसाठी १,२९० रुपये भरावे लागतील.
-
सर्व फोटो : Pexels
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?