-
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात.
-
रील्समधुन कमी वेळात जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो. रील्समध्ये व्हिडीओच्या माध्यमातूम डान्स, गाणी, मिमक्री, एखाद्या चित्रपटातील सीन, कलाकारांचे वेगेवेगळे आर्ट फॉर्म असं बरचं काही शेअर करता येते.
-
सर्व इन्स्टाग्राम वापरकर्ते रील अधिकाअधिक आकर्षक आणि हटके कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात.
-
पण त्यासाठी सर्वात आधी इन्स्टाग्रामचे सर्व फीचर्स जाणून घेतले पाहिजेत. म्हणजे सर्व फीचर्सचा वापर करून आकर्षक रील बनवण्यात मदत होईल. इन्स्टाग्रामचे कोणते फिचर्स आकर्षक रील बनवण्यासाठी मदत करू शकतात जाणून घेऊया.
-
रीलची लेआउट सादरीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावते. म्हणून योग्य लेआउट निवडणे आवश्यक आहे. रील बनवण्यासाठी तीन प्रकारचे लेआउट उपलब्ध आहेत. व्हिडीओच्या साईजनुसार तुम्ही त्यातील लेआउट निवडू शकता.
-
रील्समध्ये कमी वेळेत खूप माहिती द्यायची असते, त्यामुळे व्हिडीओ स्पीड खूप महत्वाचा ठरतो. जर तुम्हाला जास्त माहिती द्यायची असेल तर व्हिडीओ स्पीड वाढवणे गरजेचे आहे. सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय निवडु शकता.
-
व्हिडीओ ड्युरेशन देखील रीलच्या कंटेंटनुसार निवडा, जेणेकरून रील अधिक आकर्षक दिसेल
-
गाण्यांमुळे कोणताही व्हिडीओ कंटेंट अधिक आकर्षक होतो, त्यामुळे योग्य आणि लोकप्रिय गाण्यांची निवड करावी. म्हणजे युजर्सना तुमची रील आवडेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत रील शेअर केली जाईल.
-
व्हिडीओमध्ये जर प्रकाश व्यवस्थित नसेल तर तो जास्त पाहिला जात नाही. त्यामुळे व्हिडीओ बनवताना याची काळजी घ्या किंवा जर व्हिडीओ बनवल्यानंतर हे लक्षात आले असेल तर तुम्ही इफेक्ट्स वापरू शकता. रील्समध्ये इफेक्ट्स हा पर्याय उपलब्ध असतो, इफेक्ट्समुळे रील अधिक आकर्षक होईल. ((सर्व फोटो सौजन्य : Pexels)

Daily Horoscope : बुध मार्गी होऊन ‘या’ राशींचे नशीब बदलणार? कोणाला बक्कळ धनलाभ तर कोणाच्या कुंडलीत मोठे बदल होणार; वाचा राशिभविष्य