-
इंटेरनेटशिवाय कोणतेही काम करणे आजकाल अशक्य वाटते. अशात रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असणारा डेटा सांभाळून वापरावा लागतो.
-
प्रत्येकवेळी डेटा संपणार तर नाही ना याची काळजी वाटते. कधीकधी महत्वाचे काम करत असताना डेटा संपतो, अशावेळी काय करायचे हा प्रश्न उभा राहतो.
-
यासाठी तुमच्या फोनमध्येच पर्याय उपलब्ध आहे, पण तो बऱ्याच जणांना माहित नसतो. काय आहे हा पर्याय आणि डेटा मिळवण्यासाठी कसा वापरता येईल जाणून घेऊया
-
फेसबूकमध्ये फ्री वायफाय सर्व्हिस हा पर्याय आहे, ज्याद्वारे फ्री इंटरनेट वापरता येते. फेसबूकच्या मते लोकल बिझनेस करणाऱ्यांकडे जो वायफाय असतो, तो फेसबूककडुन व्हेरीफाय केलेला असतो. तो वायफाय कोणीही वापरू शकते. बहुतांश वेळा या वायफायला पासवर्ड नसतो.
-
फेसबूककडे वायफाय फाउंडर नेटवर्क असते, जिथुन फ्री इंटरनेट वापरता येते. हे फीचर फेसबूकमध्ये लपलेले असते, याला सीक्रेट टूल म्हणता येऊ शकते.
-
पुढील स्टेप्स वापरून फेसबूकच्या मदतीने मिळवा फ्री इंटरनेट
-
सर्वात आधी फेसबूक ॲप उघडा आणि त्यात मेन्यू (तीन आडव्या रेषा असणारे चिन्ह) पर्यायामध्ये जा.
-
त्यात सेटिंग्स अँड प्रायवसी पर्यायावर क्लिक करा. तिथे फाईन्ड वायफाय पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
-
त्यानंतर फेसबुक तुम्हाला जवळपास उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटची माहिती देईल. त्याबरोबर नकाशा आणि लोकेशन या दोन्हींची माहिती स्पष्टपणे देण्यात येईल.
-
सी मोर पर्याय निवडल्यास वायफायबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल.
-
ऑपशनवर क्लिक केल्यावर वायफाय पर्यंत जाण्याचा रस्ता दाखवला जाईल.
-
काही ठिकाणी फ्री वायफाय उपलब्ध नसल्यास त्यासाठी पैसे भरावे लागतील. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही