-
iPhone 14 Five Pro feature: Apple ने अलीकडेच कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे Apple च्या फार आउट कार्यक्रमात iPhone 14 Pro लाँच केला.
-
Apple ने अनेक नवीन फीचर्ससह iPhone 14 सीरीजचे फोन लॉंच केले आहेत.
-
विशेषतः Apple iPhone 14 Pro 5 नवीन फीचर्ससह लॉंच करण्यात आला आहे.
-
अॅपलने या फीचर्समध्ये काही बदल केले आहेत. हे फीचर्स तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये आधीच दिले जात आहेत.
-
ऑलवेज-ऑन डिस्प्ले
Apple ने iOS 16 मध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले नावाचे फीचर सादर केले आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे डिस्प्ले बंद असतानाही स्क्रीनचे काही पिक्सेल चालू राहतात, जे खूप कमी बॅटरी वापरून वेळ आणि संदेश यासारखी महत्त्वाची माहिती दाखवतात. हे विशेष फीचर सॅमसंगने 2016 मध्ये Galaxy S7 फोनमध्ये लॉंच केले होते. यानंतर, इतर कंपन्यांनी देखील त्यांच्या AMOLED पॅनल अँड्रॉइड फोनमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर द्यायला सुरुवात केली. (Image Source: Twitter/rhogelleim) -
क्रॅश डिटेक्शन
Apple ने iOS 16 सह iPhone मध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर लाँच केले आहे. हे फिचर पहिल्यांदा गुगल पिक्सेलमध्ये सादर करण्यात आले होते. गुगलने त्याचा वैयक्तिक सुरक्षा अॅपमध्ये समावेश केला आहे. सध्या, हे फक्त पिक्सेल डिव्हाईसपुरते मर्यादित आहे. ऍपलच्या क्रॅश डिटेक्शन फीचरमध्ये गुगलच्या फीचरप्रमाणे एसओएस सेट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, जो अपघात झाल्यास उपयुक्त ठरतो. (Express Photo) -
लॉक स्क्रीन विजेट
Google ने 2012 पासून Android मध्ये लॉक स्क्रीन विजेट फीचर्स सादर केले. मात्र काही कारणास्तव ते नंतर काढण्यात आले. पण Android मधील काही थर्ड पार्टी अॅप्स लॉक स्क्रीन विजेटचा पर्याय देतात. Apple ने iOS 16 सह iPhone मध्ये लॉक-स्क्रीन विजेट जोडले. Google आणि Apple OS दोन्हीमध्ये लॉक स्क्रीन कस्टमायझेशन खूप मर्यादित आहे. (Image credit: Google) -
ऑटो फोकस फ्रंट कॅमेरा
इतर फीचर्सप्रमाणेच हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोनमध्येही वर्षानुवर्षे आहे. Apple ने नवीन iPhone 14 सीरीजमध्ये फ्रंट कॅमेरा ऑटो फोकस हे फीचर सादर केले आहे. हे फीचर पहिल्यांदा Pixel 3XL मध्ये देण्यात आले होते, जे २०१८ मध्ये लॉंच झाले होते. दुसरीकडे, Galaxy S22 स्मार्टफोन देखील सेल्फी ऑटोफोकस कॅमेरा सह येतो. -
अॅक्शन मोड
Apple ने iPhone 14 सीरीज iPhones मध्ये Action Mode फीचर देखील जोडले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते मोबाइल यूजरन स्टेबल व्हिडीओ शूट करण्यास मदत करते. म्हणजेच हे फीचर एक प्रकारे जिम्बलसारखे कार्य करते. आयफोनच्या आधी हे फीचर सॅमसंग आणि इतर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आले आहे.

पुण्यात भयंकर अपघात! काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या, पण पुढच्याच क्षणी…;नशीब अन् कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा