-
आपल्या घरात स्मार्ट टीव्ही असावा, ज्यावर कटुंबासोबत वीकएन्डला एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज आरामात पाहता येईल अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी कमी किंमतीतील उत्तम स्मार्ट टीव्हीच्या शोधात आपण असतो.
-
सणांच्या काळात प्रत्येक वस्तुवर ऑफर दिली जाते. त्यामुळे बरेच जण टीव्ही खरेदीसाठी वेगवेगळे सेल कधी सुरू होणार याच्या शोधात असतात. यातील लोकप्रिय ऑनलाईन सेल म्हणजे ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल.
-
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर भरपूर डिस्काउंट दिला जातो. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण विशेष बाब म्हणजे या ई-कॉमर्स वेबसाइटने सेल सुरू होण्याआधीच किकस्टार्टर डील्स ऑफर केल्या आहेत.
-
या डील्स अंतर्गत, ग्राहक चांगल्या किंमतीत स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करू शकतील. ग्राहक या सेल मधून वन प्लस (One Plus), सॅमसंग (Samsung) सारख्या लोकप्रिय ब्रँडचे टीव्ही २५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतील.
-
Sony Bravia ३२ Inch HD Ready LED TV : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या टीव्हीवर ५,९९८ रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. डिस्काउंटमुळे या टीव्हीची किंमत २३,९९९ रुपये होते. या स्मार्ट टीव्हीमध्ये ६०Hz चा रिफ्रेश दर उपलब्ध आहे. यासोबतच डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह २०W आउटपुट उपलब्ध आहे. याशिवाय यात ओटीटी (OTT) सपोर्टही उपलब्ध आहे. (Photo : sony.co.in)
-
OnePlus 43 Inch Y Series Full HD Android LED TV : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या टीव्हीवर ७,०४० रूपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. डिस्काउंटमुळे ग्राहक ही टीव्ही २४,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. हा टीव्ही बेझल डिझाइनमध्ये येतो आणि त्याला 60Hz चा रिफ्रेश दर उपलब्ध आहे. ग्राहकांना या टीव्हीमध्ये अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध होईल, तसेच यात २०W डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात २ एचडीएमआय पोर्ट, २ युएसबी पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आले आहेत. (Photo : oneplus.in)
-
Kodak 43-inch 4K Ultra HD Smart Android LED TV: या टीव्हीवर ११,९०० रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. डिस्काउंटमुळे याची किंमत २१,९९९ रुपये होते. या टीव्हीचा रिफ्रेश दर ६०Hz आहे. यामध्ये ग्राहकांना ४०W ऑडिओ आउटपुट मिळेल. यात २ एचडीएमआय पोर्ट्स, २ युएसबी पोर्ट्ससारखे कनेक्टिव्हिटी पर्याय; तसेच ब्लूटूथ आणि वायफाय यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. (Photo : kodaktv.in)
-
Samsung 32-inch HD Ready Smart LED TV : किकस्टार्टर डील्स अंतर्गत, या टीव्हीवर ६,०६९ रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. या डिस्काउंटनंतर ग्राहक हा टीव्ही २२,८०४ रुपयांमध्ये घरी आणू शकतात. या टीव्हीमध्ये ६०Hz चा रिफ्रेश दर उपलब्ध आहे. यात ४०W ऑडिओ आउटपुटसह डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात २ एचडीएमआय पोर्ट, १ युएसबी पोर्ट, हेडफोन जॅक हे पर्याय देण्यात आले आहेत. (Photo : samsung.com)
-
TCL 40-inch Full HD Android R Smart LED TV : किकस्टार्टर डीलमध्ये या टीव्हीवरदेखील डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे, डिस्काउंटमुळे हा टीव्ही १८,९९० रुपयांना खरेदी करता येईल. यात २ स्टीरिओ इंटिग्रेटेड स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी ऑडिओसह उपलब्ध होतात. यात क्वाड कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅमसह ८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. (Photo : Tcl.com) (उर्वरित फोटो सौजन्य : Freepik)
घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”