-
अॅपलची नवी आयफोन १४ सीरिज लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलवर ऑफर्सचा जणू पूरच आला आहे. कंपनीनेही आपल्या जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत.
-
दरम्यान, कमी बजेटमुळे तुम्हीही अॅपलचे जुने मॉडेल घ्यायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
२३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आयफोनच्या जुन्या मॉडेल्सवर मोठ्या सवलती मिळण्याची शक्यता आहे.
-
पण जर तुम्ही सेलपर्यंत थांबू शकत नसाल तर सेल सुरू होण्यापूर्वी सध्या आयफोनवर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत ते आपण जाणून घेऊया.
-
iPhone 13: आयफोन १३ ची किंमत ६९,९०० रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला १९,००० रुपयांची सूट मिळू शकते.
-
जर तुमच्याकडे आयफोन ११ असेल, तर आयफोन १३च्या खरेदीवर तुम्हाला १८,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
-
पण जर तुम्हाला फ्लिपकार्टचा सेल सुरु होईपर्यंत थांबणे शक्य असेल, तर आयफोन १३ वर तुम्हाला २०,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.
-
फ्लिपकार्टने अलीकडेच सेल पेजवर संकेत दिले आहेत की हा फोन ४९,९०० रुपयांपर्यंत स्वस्त होईल. तथापि, ही वन टाइम ऑफर असेल.
-
आयफोन १२ बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन फ्लिपकार्टवर ६४,९०० रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे.
-
पण जर तुम्ही जुना फोन बदलला तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत १९,००० रुपयांची सूट मिळू शकते.
-
याशिवाय अॅक्सिस बँक कार्डधारकांना आयफोन १२ वर ५% सूटही मिळू शकेल.
-
फ्लिपकार्ट सेलमध्ये या आयफोनची किंमत आणखी कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे. (सर्व फोटो : अॅपल)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…