-
WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठा धक्का देणारे अपडेट सध्या चर्चेत आहे. कंपनी लवकरच काही डिव्हाईसमधुन व्हाट्सऍप बंद करणार आहे.
-
जर तुम्हीही हे मोबाईल वापरात असाल तर तुम्हाला नवा फोन घ्यावा लागू शकतो.
-
WABetaInfo नुसार,काही आयफोन डिव्हाइससाठी व्हाट्सऍप समर्थन बंद होणार आहे. iOS 10 आणि iOS 11 सॉफ्टवेअर वापरकर्ते यापुढे व्हाट्सऍप वापरू शकणार नाहीत.
-
ऑक्टोबर २०२२ पासून व्हाट्सऍप iOS 10 आणि iOS 11 सिस्टीममध्ये काम करणे थांबेल.
-
काही वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर लवकरच त्यांच्या स्मार्टफोनवर कार्य करणे थांबवेल असे नोटिफिकेशन अगोदरच प्राप्त झाले आहे.
-
व्हाट्सऍप iOS 10, iOS 11, iPhone 5 आणि iPhone 5C साठी सपोर्ट बंद करण्याचा विचार करत आहे.
-
तुम्ही iOS 10 किंवा iOS 11 वापरत असल्यास, व्हाट्सऍप वापरणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला iOS 12 वर अपडेट करणे आवश्यक आहे.
-
तुमचा आयफोन iOS 12 सह अपडेट करण्यासाठी मोबाईलच्या जनरल सेटिंग पर्यायात सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर क्लिक करायचे आहे.
-
यंदा Apple iOS 16 लाँच करण्याच्या तयारीत आहे. तूर्तास आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 15.6 हे अपडेट उपलब्ध आहे. तब्बल ७२ टक्के आयफोन वापरकर्ते हे अपडेटेड iOS प्रणाली वापरत आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल