-
सध्याचा काळ ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. (Express file photo/representational)
-
जगभरात इलेक्ट्रिक कार आणि हायब्रीड कारसह अशा प्रकारच्या वाहतुकीच्या पर्यायांची चर्चा सध्या जोरात आहे.
-
अशा पर्यायांमुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी प्रमाणात होतंय. (Photo: REUTERS)
-
या घडामोडींदरम्यान नेदरलँडमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. (Photo: REUTERS)
-
या विद्यार्थ्यांनी अशी कार तयार केली आहे, जी पर्यावरणाची कमी हानी तर करतेच, पण पर्यावरणाचे आधीपासून झालेले नुकसान सुद्धा कमी करण्यास मदत करते. (Photo: REUTERS)
-
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा पराक्रम नेदरलँडमधील आइंडहोव्हन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. (Photo: REUTERS)
-
TU/Ecomotive या विद्यार्थ्यांच्या टीमने GEM (झिरो एमिशन मोबिलिटी) नावाची कार डिझाईन केली आहे, जी रस्त्यावरून धावताना आजूबाजूच्या वातावरणातून कार्बन शोषून घेते. (Photo: REUTERS)
-
यामुळेच BMW सारखी दिसणारी ही कार सर्वात स्पेशल आहे. (Photo: REUTERS)
-
ही कार पर्यावरणातील उत्सर्जनापेक्षा जास्त कार्बन शोषून घेते. (Photo: REUTERS)
-
या वैशिष्ट्यांमुळे ही कार जगातील सर्वात टिकाऊ कार बनली आहे. (Photo: REUTERS)
-
अहवालानुसार, TU/Ecomotive चे फायनान्स मॅनेजर जेन्स लाहाईजे म्हणाले की, “आमचे अंतिम ध्येय हे शक्य तितके सस्टेनेबल फ्यूचर निर्माण करणे आहे. (Photo: REUTERS)
-
जेन्स कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगतात की, जेममध्ये दोन लोक एकाच वेळी बसू शकतात. (Photo: REUTERS)
-
कारचे बहुतेक भाग 3D-प्रिंट केलेले आहेत आणि रिसाइकल्ड प्लास्टिकपासून बनवले आहेत. (Photo: REUTERS)
-
बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करत नाहीत, पण बॅटरी सेलच्या निर्मितीमध्ये इतके प्रदूषण होते की पारंपारिक इंधनावरील कारऐवजी हजारो मैल इलेक्ट्रिक कार चालवून त्याची भरपाई केली जाईल.(Photo: REUTERS)
-
TU/Ecomotive ने जेममध्ये दोन फिल्टर वापरले आहेत, जे २० हजार मैलाच्या ड्रायव्हिंगमध्ये २ किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. (Photo: REUTERS)
-
आगामी काळात चार्जिंग स्टेशनवर हे फिल्टर रिकामे करण्याची सुविधा विकसित करण्याचे टीमचे स्वप्न आहे. (Photo: REUTERS)
-
यूएस प्रमोशनल टूरमध्ये टीम अनेक विद्यापीठांमध्ये ही कार दाखवणार आहे. (Photo: REUTERS)
-
ईस्ट कोस्टपासून ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत अनेक कंपन्यांमध्ये ते आपली कार सादर करणार आहे. (Photo: REUTERS)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य