-
मोबाईलशिवाय कोणतेही काम करणे आजकाल अशक्य वाटते. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामांसाठी आपण मोबाईलवर अवलंबून असतो.
-
तर काहीजणांसाठी हे मनोरंजनाचे साधन असते. ऑनलाईन गेम्स खेळणे, ऑनलाईन चित्रपट, मालिका, वेब सीरिज पाहणे यासाठी तासनतास मोबाईलचा वापर केला जातो. स्वतःबरोबर सतत बाळगणाऱ्या या मोबाईबाबत आपण नकळत अशा काही गोष्टी करतो ज्यांमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.
-
कधीकधी फोन गरम झाला आहे असे आपल्याला जाणवते, जास्त वेळ वापरल्यामुळे कदाचित हे होत असेल असे समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण यामुळे फोनचा स्फोट देखील होऊ शकतो.
-
हे टाळण्यासाठी मोबाईल वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घ्या.
-
लोकल चार्जर चा वापर टाळा : मोबाईल चार्जिंगसाठी लोकल चार्जर वापरल्याने बॅटरीवर दबाव पडतो, त्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी चार्जिंग करताना मोबाईलबरोबर मिळालेला चार्जर वापरावा.
-
क्षमतेपेक्षा अधिक हेवी गेम खेळणे : मोबाईलच्या क्षमतेपेक्षा जास्त हेवी गेम सतत खेळल्याने प्रोसेसर अधिक वेगाने काम करू लागतो. त्यामुळे फोन गरम होउन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.
-
फोन बॅगमध्ये ठेऊ नका : उन्हाळ्यात जास्त वेळ फोन न वापरता एखाद्या लेदर बॅगमध्ये खूप वेळ ठेवला तर त्याचा स्फोट होउ शकतो. यासाठी खूप वेळ फोन बॅगेत ठेऊ नये असा सल्ला दिला जातो.
-
चार्जिंग होत असताना वापरू नका : चार्जिंग होत असताना फोन वपारल्याने तो लगेच गरम होतो, कारण त्यावर अधिकचा ताण पडतो. अशावेळी फोन खूप गरम झाला तर त्याचा स्फोट होऊ शकतो.
-
नेहमी अपडेट करा : जर तुम्ही काही महिन्यांपर्यंत फोन अपडेट केला नाही तर त्यामधील प्रोसेसर नीट काम करत नाही.
-
जर प्रोसेसर नीट काम करत नसेल तर फोन सतत गरम व्हायला सुरूवात होते, ज्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी फोनला अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो.
-
(फोटो सौजन्य : Pexels)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित