-
ॲपलने ऑक्टोबर, २०२२ मध्ये आपली नवीनतम आयफोन १४ स्मार्टफोन मालिका सादर केली होती. आता तुम्हाला आयफोन १४ अगदी स्वस्तात खरेदी करू शकता येणार आहे.
-
हा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्ही ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
-
तुम्हाला आयफोन १४ खरेदी करायचा असेल तर यासाठी अॅमेझाॅन किंवा फ्लिपकार्टवर सर्वोत्तम डील उपलब्ध नाही.
-
ही डील युनिकॉर्न स्टोअरमध्ये दिली जात आहे. कंपनीच्या उत्पादनांसाठी हा प्रीमियम पुनर्विक्रेता आहे.
-
या डीलमध्ये तुम्ही ३७,००० रुपयांमध्ये आयफोन १४ खरेदी करू शकता. १२८ जीबी असलेल्या आयफोन १४ ची किंमत ७९,९०० रुपये आहे.
-
सेल दरम्यान, एचडीएफसी बँक वापरकर्त्यांना ५,००० रुपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक दिला जात आहे. यामुळे त्याची किंमत ७४,९०० रुपयांपर्यंत खाली आली आहे.
-
याशिवाय, कंपनीने एक्सचेंज ऑफरसाठी कॅशिफायसोबत भागीदारी केली आहे.
-
यासह, वापरकर्त्यांना ६,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. म्हणजेच, जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला फोनची स्थिती आणि मॉडेलच्या आधारावर एक्सचेंजची रक्कम दिली जाईल. यानंतर त्यात एक्सचेंज बोनस जोडला जाईल.
-
तुम्हाला जास्त किंमतीसाठी फोन योग्यरित्या एक्सचेंज करावा लागेल. (फोटो साैजन्य- Indian Express )

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड