-
आयफोन म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अॅपल कंपनी. परंतु आता अॅपल कंपनी आयफोननंतर रिटेल स्टोअरमध्ये उतरणार आहे. (सर्व छायाचित्र : प्रदीप दास)
-
Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याचे सूतोवाच केले आहेत. अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे.
-
मुंबईच्या अॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील.
-
Apple च्या पहिल्या स्टोअरचा अनुभव वापरकर्ते Apple BKC वॉलपेपर डाउनलोड करून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला स्पेशल साउंड आणि Apple म्युझिकची प्ले-लिस्ट मिळणार आहे.
-
भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे.
-
त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्लीमध्ये उभारले जाणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे.
-
इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे.
-
मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे.
-
Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारले जणार आहे.
-
ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.
-
Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे.
-
फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे.
-
फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
-
फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत.
-
फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरू होऊ शकते.
-
-
-
-
-
-
-

