-
Galaxy M14 5G हा Samsungच्या M-सिरीजमधील स्मार्टफोन आहे. या श्रेणीतील बहुतेक फोन पेक्षा या फोनची बॅटरी लाइफ खूपच चांगली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की हा फोन एका चार्जिंगवर काही दिवसंपर्यंत काम करू शकतो.
-
M14 मध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे माध्यम वापरामध्ये हा फोन आपण जवळपास दोन दिवस वापरू शकतो. स्मार्टफोनचा जास्त वापर करणारे लोकही एका चार्जिंगवर किमान दिवसभर हा फोन वापरू शकतात. जर तुम्ही दीर्घकाळ बॅटरी टिकणाऱ्या फोनच्या शोधात असाल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
-
M14 मध्ये 25W टाइप-सी फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल पण बॉक्समध्ये चार्जर देण्यात आलेला नाही. फास्ट चार्जिंगसाठी तुम्हाला स्वतंत्र कंप्लायंट चार्जर विकत घ्यावा लागणार आहे. बॉक्समध्ये केवळ टाइप-सी ते टाइप-सी केबलसह M14 स्मार्टफोन पाठवला जातो.
-
M14 मध्ये Exynos 1330 प्रोसेसर आहे. मात्र स्पर्धात्मक गेमिंगसाठी फोन नाही.
-
या प्रोसेसरमध्ये 4GB रॅम आणि 128GB तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सपोर्ट उपलब्ध आहे. फोनची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते असे म्हटले जात आहे.
-
हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Samsung ची One UI Core आवृत्ती 5.1 आहे.
-
M14 च्या डिस्प्लेमध्ये FHD + रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारे वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. तसेच त्याचे रिझोल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल इतके आहे. तर फोनमध्ये रंग अतिशय उठून दिसतात.
-
फोटोग्राफीसाठी हा उत्तम स्मार्टफोन आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, ज्यामध्ये 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 13MP सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे.
-
M14 मध्ये हेडफोन जॅक आहे परंतु ते मोनो स्पीकर सेटअपसह करावा लागेल. बायोमेट्रिक्स साइड-माउंट केलेल्या फिंगरप्रिंट रीडरद्वारे हाताळले जातात.
-
Samsung Galaxy M14 5G ची भारतात 4GB/128GB साठीची किंमत 13,490 रुपयांपासून सुरू होते. 6GB/128GB सह टॉप-एंड मॉडेल तुम्हाला 14,990 रुपयांपर्यंत मिळू शकतो. त्यामुळेच 15 हजारांच्या खालच्या श्रेणीमध्ये स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली