-
जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ॲपलने भारतात आपले दोन स्टोअर सुरू केले आहेत.
-
भारतात Apple प्रोडक्टची वाढती मागणी पाहता मुंबई आणि दिल्लीमध्ये कंपनीने आपले अलिशान स्टोर्स सुरु केले आहे.
-
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतंच भारतात अॅपल स्टोअरचं उद्घाटन केलं असून या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.
-
मुंबई आणि दिल्ली येतील दोन स्टोअर हाताळण्यासाठी कंपनीने तब्बल १७० कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती आहे.
-
Apple कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांनाही त्याच तोडीचा पगारही देते.
-
Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा कंपनी नेमका किती पगार देते हे तुम्हाला माहित आहे का? पगार किती आणि त्यांचे शिक्षण किती याबद्दल जाणून घेऊया..
-
अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे.
-
अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे.
-
अशा अनेक क्षेत्रांतील अभ्यासक्रमातून पुढं आलेल्या तरुणाईला अॅपल स्टोअरमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
-
एका अहवालानुसार, Apple Store मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्याची माहिती आहे.
-
मुंबईतील Apple Store मध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना २५ हून अधिक भाषा येतात, तर दिल्लीतील स्टोअरमध्ये कर्मचारी १५ वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि समजतात.
-
ॲपल हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, त्यामुळे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधाही देते. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य