-
Apple चा WWDC २०२३ इव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यात आली. (Image Credit-Apple)
-
WWDC २०२३ इव्हेंटमध्ये कंपनीने पहिला मिक्स रिअॅलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. याला ‘अॅपल व्हिजन प्रो’ असे नाव देण्यात आले आहे. (Image Credit-Apple)
-
नवीन लॉन्च झालेल्या १५ इंचाच्या मॅकबुक एअरची किंमत १,३४ ९०० रुपये इतकी आहे. (Image Credit-Apple)
-
WWDC इव्हेंटमध्ये कंपनीने New Mac Pro लॉन्च केला आहे. हा मॅक M2 अल्ट्रा 24-कोर CPU द्वारे समर्थित आहे. (Image Credit-Apple)
-
iOS 17 अपडेट कंपनीने रिलीज केली असून हे अपडेट मिळू शकते अशा आयफोन्सची यादीसुद्धा जाहीर केली आहे. (Image Credit-Apple)
-
कंपनीने iPadOS 17 हे नवीन टॅबलेट सॉफ्टवेअर सादर केले आहे. ज्यामध्ये नवीन मेसेज, एअरड्रॉप क्षमता आणि टेक्स्ट इनपुटसाठी स्मार्ट ऑटोकरेक्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. (Image Credit-Apple)
-
Apple ने स्मार्टवॉचसाठी watchOS 10 ला नवीन वापरकर्ता युजर इंटरफेससह लॉन्च केले आहे. याचे नवीन डिझाईन इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. (Image Credit-Apple)
-
Apple ने tvOS 17 अपडेटची घोषणा केली आहे. एक मोठे फिचर फेसटाईम आता Apple टीव्हीवर येणार आहे. नवीन FaceTime अॅप तुमच्या मोठ्या स्क्रीन टीव्हीवर व्हिडिओ कॉल आणण्यासाठी तुमचा iPhone किंवा iPad कॅमेरा वापरतो. (Image Credit-Apple)
-
macOS सोनोमा, त्याच्या Mac ऑपरेटिंग सिस्टमची नवीन सिरीज आहे. ज्यामध्ये विजेट्स , Apple TV अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. (Image Credit-Apple)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा