-
मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही.
-
स्मार्टफोनमुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सहजरित्या एका क्लिकवर करता येतात.
-
पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे.
-
बराच वेळ आपण ज्या फोनवर घालवतो त्यातील काही फीचर्स किंवा त्यावर असणाऱ्या विविध टॅब्सचा वापर कशासाठी होतो हे बऱ्याच वेळा माहीत नसते.
-
फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो.
-
बहुतांश स्मार्टफोनच्या खालच्या बाजुला चार्जिंग कनेक्शन जोडण्याच्या शेजारी एक लहान होल असतो.
-
बऱ्याच वेळा तो फोनच्या डिझाईनचा एक भाग असेल असे गृहीत धरून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
-
अनेकांना हा होल नेमका कसला आहे याबाबत माहिती नसते. या होलची स्मार्टफोन वापरात मोठी भूमिका आहे.
-
हा होल आपण फोनवर बोलत असताना आपल्या आजूबाजूला असणारा आवाज रोखण्याचे काम करतो.
-
आपण फोनवर बोलताना आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचा गोंधळ असतो. पण बाजूला मोठा आवाज असला, तरी समोरील व्यक्ती तुमचा आवाज ऐकू शकते. यात या लहानशा होलची मोठी भूमिका असते.
-
या होलला ‘नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोन’ म्हटले जाते. फोनवर बोलत असताना हे ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होते.
-
तुम्ही खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी जरी असला तरी या नॉइस कॅन्सलेशन माइक्रोफोनमुळे आजूबाजूचा आवाज कॅन्सल होऊन फक्त तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत क्लिअर पोहोचण्यास मदत होते. (Photos: financialexpress)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ