-
रॉयल एनफील्डची भारतीयांमध्ये असलेली क्रेझ ही काही नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून रॉयल एनफील्डच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर रुबाबात मिरवत आहेत. Royal Enfield Fury 175 ही देशातली सर्वात आयकॉनिक बाइक आहे. (फोटो: bikes4sale)
-
Yamaha RX100 : या बाइकला कोणत्याही परिचयाची गरज नाही आणि आजही ती एक लोकप्रिय मोटरसायकल आहे. Yamaha RX100 ची निर्मिती Yamaha ने जपानमध्ये केली होती आणि १९८५ मध्ये एस्कॉर्ट्स ग्रुपने ती भारतात आणली होती. (PC : Maxabout)
-
Suzuki Shogun : ही आरएक्स १०० सारखीच एक बाइक होती. परंतु स्पीडच्या बाबतीत तिने RX 100 लाही मागे टाकलं होतं. ही बाइक भारतात १९९३ साली लाँच करण्यात आली होती. (PC : Cartoq)
-
Kawasaki kb100 : कावासाकी KB100 मध्ये 125cc इंजिन देण्यात आलं होतं. परंतु भारतातल्या इंजिनसंबंधीच्या निर्बंधांमुळे ती 100cc मध्ये बदलण्यात आली. १९९६ पर्यंत ही बाइक भारतात विकली जात होती. (PC : TeamBHP)
-
हीरो होंडा सीबीझेड : ही बाईक १९९९ मध्ये लॉन्च झाली तेव्हा या बाइकने भारतात सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. यात १५६ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन होतं. तसेच CBZ ही डिस्क ब्रेक असलेली आधुनिक युगातील पहिली मोटरसायकल देखील होती. या बाइकची देशात तुफान विक्री झाली. CBZ २००५ मध्ये बाजारातून गायब झाली. (PC : wikipedia)
-
बजाज पल्सर : ही भारतातली एक आयकॉनिक बाइक असून आजही कंपनी या बाइकचे वेगवेगळे व्हेरिएंट्स विकते. या बाईकच्या पहिल्या मॉडेलने बजाज ऑटोला भारतीय बाजारात स्थान मिळवून दिलं. ही आजवरची भारतीय बाजारातली हीरो स्प्लेंडरनंतरची दुसरी सर्वाधिक विकली गेलेली बाइक आहे. (PC : Bajaj Auto)
-
Yamaha RD350 : यामाहाच्या RX100 प्रमाणेच, एस्कॉर्ट्स ग्रुपने RD350 ची भारतात विक्री केली होती. वेगाचं वेड असलेले तरूण ही बाइक चालवायचे त्यामुळेच लोक RD म्हणजेच ‘रेसिंग डेथ’ असं म्हणू लागले होते. ही भारतातली आयकॉनिक बाइक आहे. (PC : TeamBHP)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”