-
vivo आणि iQOO या वर्षी नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची शक्यता आहे.
-
फोनची डिझाइन आणि कॅमेरा यावर कंपनीने खास लक्ष दिले आहे.
-
Vivo आणि iQOO चे नवे मोबाइल बाजारात वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध असतील.
-
2024 मध्ये लॉन्च होऊ शकणाऱ्या Vivo X100 Ultra, V30, iQOO Z9 या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.
-
Vivo X100 Ultra क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen3 चिपसेटमध्ये येणार आहे. या फोनमध्ये अल्ट्रा-हाय-एंड कॅमेरा सेटअप देखील असू शकतो.
-
या फोनची अपेक्षित किंमत सुमारे एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
-
Vivo V30 आणि V30 प्रो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च होणार आहेत.
-
यामध्ये ग्राहकांना 50MP मुख्य आणि फ्रंट कॅमेरा, 12GB रॅम, 512GB स्टोरेज आणि 80W फास्ट चार्जिंग सह 5,000mAh बॅटरी युनिट मिळू शकते. V30प्रो मध्ये 50 MP पोटरेट लेन्स देखील असू शकते.
-
Vivo V30ची अपेक्षित किंमत सुमारे ३५ हजार रुपये आणि Vivo V30 Prची किंमत ४५ हजार रुपये अशी आहे.
-
iQOO देखील Z9 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. माहितीनुसार यामध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर आहे. मुख्य कॅमेरामध्ये OIS सह 50MP लेन्स देखील आहे. या फोनची अपेक्षित किंमत २५ हजार रुपये सांगण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो : vivo आणि iQOO अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”