-
व्हॉट्स अॅप आपल्या यूजर्सला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी अॅपमध्ये काही नवीन अपडेट करत असते. या इन्स्टंट मेसेजिंग ॲपमुळे आपण सहजपणे आपल्या मित्र आणि कुटुंबाशी अधिक सोयीस्करपणे कनेक्टेड राहू शकतो.
-
रेपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सॲप एका नवीन अपडेटवर काम करत आहे ज्यामध्ये आता यूजर्स इतरांच्या स्टेटसवर प्रतिक्रिया देऊन त्यांना लगेच प्रतिसाद देऊ शकतात.
-
‘WA Beta Info’नुसार व्हॉट्स अॅप लवकरच अॅपमध्ये दोन नवीन अपडेट आणणार आहे.
-
या नवीन अपडेट्समध्ये व्हॉट्सॲप अशा फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये लोक इतरांच्या स्टेटसवर सोप्यापद्धतीने प्रतिक्रिया देऊन त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. हे ऑप्शन तुम्हाला स्टेटस स्क्रीनवरच दिसणार आहे.
-
दुसऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्स अॅप यूजर्स त्यांचे आवडते कॉनटॅक्टला एका वेगळ्या ग्रुपमध्ये अॅड करू शकतील.
-
या अपडेटमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या आवडते कॉनटॅक्टला किंवा ग्रुपला वेगळा गट देता तेव्हा हे फीचर त्या यूजर्सला सूचित करणारे कोणतेही अलर्ट पाठवत नाही.
-
व्हॉट्स अॅपने अजून पर्यंत अधिकृतपणे या अपडेट्सचा खुलासा केलेला नाही आणि म्हणूनच या नवीन अपडेटची पुष्टी करण्यासाठी यूजर्सला मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून अंतिम पुष्टीची प्रतीक्षा करावी लागेल.
-
(All photo credits: Unsplash)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”