-
भारतीय बाजारामध्ये बाईक्सची डिमांड नेहमी राहिली आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते.
-
मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या बाइक्सला स्टायलिश डिझाइन शिवाय, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे.
-
तुम्ही सुद्धा तुम्हाला परवडणाऱ्या, अल्प दरात उपलब्ध असणाऱ्या बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? तर, आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वोत्कृष्ट बाईकचे पर्याय ज्यांची देशभरात सर्वाधिक विक्री होते.
-
अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या दुचाकींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
-
चला तर मग कमी किमतीतील जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घेऊया…
-
TVS XL100 : TVS मोपेड बाईक XL100 ला खूप पसंत केले जात आहे. ही बाईक वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत ३९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही बाईक ८० किलोमीटरचा मायलेज देते.
-
बजाज CT110X : बजाजचा CT110X त्याच्या बोल्ड लूकमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. ही बाईक एक लिटरमध्ये ७०-७२ kmpl मायलेज देऊ शकते. बाईकची एक्स-शोरूम किंमत ६७,३२२ रुपये आहे.
-
हिरो HF100: Hero MotoCorp ची HF 100 ही परवडणारी आणि टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार, ही बाईक ८३ kmpl पर्यंत मायलेज मिळवू शकते. एक्स-शो रूम किंमत ५४,९६२ रुपयांपासून सुरू होते.
-
टीव्हीएस स्पोर्ट्स : ही बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. यात ११०cc इंजिन आहे जे ८.२९PS पॉवर आणि ८.७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. TVS स्पोर्ट एका लिटरमध्ये ११०.१२ kmpl मायलेज देते. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. TVS स्पोर्टची किंमत ६१,५०० रुपयांपासून सुरू होते. (Photos: financialexpress)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”