-
टीव्हीएस मोटर कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका केलाय. नवीन लुकसह बाजारात आपली बाईक लाँच केली आहे.
-
टीव्हीएसने Apache RTR 160 आणि Apache RTR 160 4V अपडेट केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात या दोन्ही बाईकचे ब्लॅक डार्क एडिशन लाँच केले.
-
ब्लॅक एडिशन मॉडेल दोन्ही बाईकच्या बेस व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे, त्यामुळे तुम्हाला ब्लॅक एडिशन मॉडेलमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि रियर डिस्क ब्रेक सारखे फीचर्स मिळणार नाहीत.
-
याशिवाय कंपनीने बाइकच्या डिझाईनमध्ये किंवा फिचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.
-
TVS Apache RTR 1604V या स्पेशल ब्लॅक एडिशन मॉडेलमध्ये १५९.७ cc ऑइल-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे १७.३१bhp पॉवर आणि १४.७३Nm टॉर्क जनरेट करते.
-
या TVS बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस मोनो शॉक, समोर डिस्क ब्रेक, मागील बाजूस ड्रम ब्रेक, अलॉय व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लाइटिंग असेल.
-
TVS Apache RTR 160 मध्ये १५९.७ cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड टू-व्हॉल्व्ह इंजिन आहे. या बाइकचे इंजिन १५.८bhp पॉवर आणि १३.८५Nm टॉर्क जनरेट करते.
-
तुम्हाला TVS च्या या दोन्ही बाईक ५ स्पीड गिअरबॉक्स पर्यायासह मिळतील. TVS Apache RTR 160 मध्ये तीन राइडिंग मोड, तंत्रज्ञान आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह एलईडी हेडलॅम्प मिळतील. (Photo-tvsmotor)
-
कंपनीने नवीन RTR 160 4V ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत १.२५ लाख रुपये ठेवली आहे. तसेच RTR 160 ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत १.२० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. (Photos: financialexpress)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”