-
पुण्यात नुकतंच पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्यातील काही खास पाट्या…
भर पावसातही पुणेकरांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी लावलेल्या रांगा म्हणजे आपल्याच पुणेरीपणाला दिलेली दाद आहे असं म्हणावं लागेल. -
देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अतिशय खोचक आणि नेमक्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.
-
आपल्याच शहराचे हे वैशिष्ट्य पाहताना पुणेकरांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांचे अभिमानाने फुललेले चेहरे पाहायला मिळाले.
-
कमाल शब्दात किमान अपमान ही पुणेरी पाट्यांची आणि पर्यायाने पुणेकरांच्या ओळखीचे दर्शन याठिकाणी झाले.
-
यामध्ये घरावरील, हॉटेलमधील, मंदिरातील, गॅरेजसमोरील, ऑफीससमोरील, इमारतीतील अशा असंख्य पाट्यांचे नमुने पाहायला मिळाले.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात