-
गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असणारा आणि राज्याच्या राजकीय पटलावर प्रकाशझोतात असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
-
आरक्षणासह इतरही काही मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवारी मुंबई बंदची हाक देण्यात आली.
-
ज्याचे जास्त पडसाद ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळाले.
-
सकाळपासूनच ठाण्यात विविध ठिकाणी आंदोलकांनी एकत्र येण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
-
कोणतीही हिंसा न करता हे आंदोलन शांततेनं होणार असं वाटत असतानाच ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बस फोडण्यात आली.
-
ठाण्यातील बंदला अजिंक्यतारा टॅक्सी संघटनेचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्यांवरही शुकशुकाट होता.
-
आंदोलकांनी महामार्गही अडवून धरत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
-
ठाण्यात वेस्टर्न एक्स्प्रेस वे येथे मराठा संघटांनांचे कार्यकर्ते एकवटले आणि त्यांनी महामार्ग अडवून धरला, ज्यामुळे काही काळासाठी वाहतून ठप्प झाली होती.
-
या आंदोलनाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणांकडूनही दक्षता घेण्यात आल्याचं दिसत आहे.
-
ज्या ठिकाणी आंदोलन हिंसक होऊ शकतं, अशा संभाव्य ठिकाणांवर पोलिसबळ तैनात करण्यात आलं आहे.
-
या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजलीही वाहिली. एकंदर आंदोलनाचं स्वरुप पाहता येत्या काळात त्याला कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…