-
'वपु' असं म्हटलं की अनेकांना चर्चेसाठी विषय मिळतो. मग त्यासाठी ओळख-पाळख, नाती, मैत्री, लहान- मोठेपण अशा कोणत्याच सीमा आड येत नाहीत. बहुधा वपुंच्या शब्दांनी कधी या सीमा जाणवूच दिल्या नसाव्यात. रोजच्या आयुष्यातील काही प्रसंग अगदी पटण्याजोग्या आणि तितक्याच सोप्या पद्धतीने सुरेखपणे गुंफून सादर करणारे लेखक म्हणजे सर्वांचेच लाडके व. पु. काळे. तुम्हाला भावलेले वपु कोणते, असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाच्या मनात या लेखकाची असलेली प्रतिमा आपल्या भेटीला येते. त्यामुळे वपु खऱ्या अर्थाने वाचकांचे, प्रेम करणाऱ्यांचे, शब्दसुमनांचे आणि प्रत्येकाचेच 'पार्टनर' आहेत. आज पुण्यतिथी. चला तर मग या 'पार्टनरने'च मांडलेल्या काही ओळींवर आज पुन्हा नजर टाकू, कोण जाणे आज वपु पुन्हा नव्याने आपल्याला भेटतील…
-
'स्वत:वरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात.'
-
'स्वत:चं घर स्वत:च सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं.'
-
'माणसांना जिंकणं सगळ्यात सोपं. हसतमुख चेहरा, बस्स! बाकी काही लागत नाही.'
-
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात…
-
'हजारो देणग्यांची पुष्पवृष्टी करायला परमेश्वर तयार आहे, तुम्ही फक्त स्विकारण्याची तयारी दाखवा.'
-
'माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.'
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”