महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. (फोटो सौजन्य : ANI) संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (छायाचित्र- प्रशांत नाडकर) -
यासाठी शिवतीर्थावर जोरदार तयारी सुरु आहे. (छायाचित्र- प्रशांत नाडकर)
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966ला त्यांची पहिली सभा शिवाजी पार्क इथे झाली. (फोटो सौजन्य : ANI) दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज याच शिवतीर्थावर घुमला, दसरा मेळाव्यात विचारांचे सोने शिवसैनिकांनी लुटले आणि निवडणूक प्रचारांचे नारळही फोडले. (फोटो सौजन्य : ANI) -
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. (छायाचित्र- प्रशांत नाडकर)
दरम्यान, शपथविधीसोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल २ हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. (फोटो सौजन्य : ANI) -
देशभरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबरच राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील ४०० शेतकऱ्याना तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. (छायाचित्र- प्रशांत नाडकर)
-
(छायाचित्र- प्रशांत नाडकर)
-
(फोटो सौजन्य : ANI)
-
(फोटो सौजन्य : ANI)
-
(फोटो सौजन्य : ANI)
-
(छायाचित्र- प्रशांत नाडकर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ