-
पिंपरी-चिंचवडमध्ये रांगोळीचा छंद जोपासणाऱ्या एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी रेखाटली आहे. त्यांना ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले.
-
विजयमाला उदय पाटील असं या गृहिणीचं नाव आहे. नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी ही रांगोळी त्यांनी साकारली आहे.
-
त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून तयार केलेली पैठणी पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे.
-
विजयमाला यांना काही तरी वेगळं करून दाखवायचं होतं. त्यांनी यापूर्वी अशा प्रकारची मोठी रांगोळी कधीही काढली नव्हती. त्यांना गालीचा किंवा पैठणी रांगोळीतून साकारायची होती.
-
फोटो पाहून हुबेहूब त्यांना पैठणी काढायची असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी घरातील हॉल उत्तम पर्याय होता.
-
विजयमाला या जसजशी पैठणीची रांगोळी रेखाटत गेल्या तसा वेगळाच रंग त्या पैठणीला येत होता. अगदी ती खरी पैठणी असल्यासारखी दिसायला लागली. “फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यास ती रांगोळी असल्याचे कोणाला ही विश्वास बसत नव्हता. ते कार्पेट किंवा गालीचा असल्याचं सर्वांना वाटत होतं.
-
पैठणीची रांगोळी काढण्यासाठी तब्बल दहा किलो रांगोळी लागली शिवाय सहा रंग वापरण्यात आले,” असंही त्यांनी सांगितलं. विजयमाला यांनी रांगोळीचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ