-
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ७९वा वाढदिवस आहे. मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही दुर्मिळ फोटो.
-
मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे.
राजकीय जीवनात अनेक नेत्यांच्या वाट्याला येतात तसे चढउतार पवारांच्याही वाट्याला आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही. -
ते आनंदाने कधी हुरळून गेले नाहीत आणि पराभवाने खचले नाहीत. म्हणूनच त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा थांगपत्ता कुणाला लागत नाही.
-
पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.
-
त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.
-
वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
-
१९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.
-
१८ जुलै १९७८ रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.
-
शरद पवार तीनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
-
-
केंद्रातही शरद पवारांनी संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून काम पाहिलं. कृषीमंत्री पदाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ