-
शरद पवार यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होते.
-
शरद पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला
-
शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांचीही रांग लागली होती
-
यशवंतराव चव्हणा सेंटरच्या बाहेर समर्थकांनी तुफान गर्दी केली होती
-
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या
-
बळीराजा कृतज्ञता दिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शरद पवारांच्या वाढदिवसाला समर्थकांचा जनसागर उसळला होता (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शरद पवारांची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत होते (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
राष्ट्रवादीकडून वाढदिवसानिमित्त १ कोटी ८० लाखांचा निधी देण्यात आला (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
यावेळी त्यांनी आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी असल्याचं सांगितलं (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात रहातो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर आहे याची आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
काही कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवारांना भारतरत्न दिला पाहिजे अशी मागणी केली (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
अनेक कार्यकर्ते हातात पोस्टर घेऊन झळकावत होते (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. १९३६ साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणुस आहे असेही शरद पवार म्हणाले. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्यांसाठी दिला जाईल असं शरद पवार यांनी जाहीर केलं. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शेतकर्यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. (एक्स्प्रेस फोटो – गणेश शिर्सेकर)
-
शिवसेना नेते सुभाष देसाईदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ