-
मनोहर गोपाळकृष्ण प्रभू-पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यातील म्हापसा येथे झाला.
-
अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी अशी पर्रिकरांची ओळख होती.
-
मुंबईतील आयआयटीतून मेटलर्जीमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं होतं.
-
२००१ मध्ये आयआयटी मुंबईने त्यांना विशेष माजी विद्यार्थी म्हणून गौरविले होते.
-
१९९४ मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले.
-
भारतीय जनता पार्टीचे गोव्याचे मुख्यमंत्री बनणारे ते पहिले नेते होते. भाजपाला गोव्यात सत्ता मिळवण्याचे श्रेय हे पर्रिकरांनाच जाते.
-
ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, जून ते नोव्हेंबर १९९९ या काळात विरोधी पक्ष नेते होते.
-
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर २०१४-१७ या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता.
-
मार्च २०१७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.
-
मुख्यमंत्री असतानाही पर्रिकर सरकारी गाड्यांच्या ताफ्याऐवजी चक्क स्कुटरवरुन आपल्या कार्यालयात जात. अनेकदा गोवेकरांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुचाकीवरुन कामाला जाताना पाहिले आहे.
-
मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
पर्रिकरांचे नियोजन कौशल्य अफाट होते. बऱ्याच वेळेला ते काम पूर्ण होईपर्यंत कार्यालयातच असायचे. पर्रिकर दिवसाला १५-१६ तास काम करायचे.
-
२०१६ मध्ये पर्रिकर संरक्षण मंत्री असताना मुंबई आयआयटीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांचे एक जुने शिक्षक भेटले असता मंचावरच ते शिक्षकांच्या पाया पडले होते.
-
अनेकदा पर्रिकर गोव्यातील आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोटपुजा करुन यायचे.
-
मध्यंतरी गोव्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनच्या रांगेत उभे असलेल्या पर्रिकरांचा फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
-
आपल्या शिस्तीसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे पर्रिकर हे आपल्या सहकाऱ्यांची खूप काळजी घेत. मार्च २०१२ साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलदन्हा यांचा हृयविकाराच्या तिव्र झटक्याने आस्कमिक मृत्यू झाला. तेव्हा सलदन्हा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेल्याचे अनेकांनी पाहिले होते.
-
मनोहर पर्रिकर आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्य : सोशल मीडिया)
-
१७ मार्च २०१९ रोजी पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगानं निधन झालं.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ