-
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती साजरी होत आहे. कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेते अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांना विरोधकाचंही भरभरून प्रेम मिळालं. वाजपेयी यांचा राजकीय प्रवास भारावून टाकणार आहे. त्यांच्या या प्रवासातील काही दुर्मिळ छायाचित्र… (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. किशोर वयातच वाजपेयींनी १९३९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. १९४७ मध्ये त्यांनी संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता जबाबदारी स्वीकारली.
-
साहित्यिक असलेल्या वाजपेयींच वक्तृत्व लोकांच्या मनाचा ठाव घेणारं होतं. तसेच वक्तृत्व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही लाभले होते. पक्षाच्या उभारणीत दोघांचाही महत्त्वाचा सहभाग राहिला. पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांच्यासोबत हास्यविनोद रमलेले वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
वाजपेयी यांची कारकीर्द झंझावाती राहिली. तशीच कारकीर्द केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांची राहिली. त्यांच्या कार्यकाळात शेषन यांनी आयोगाचा प्रचंड दरारा निर्माण केला होता. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी वायपेयी आणि शेषन. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर मित्रपक्षातील नेत्यांसोबत बाहेर पडलेले वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
वाजपेयींनी राजकारणाबरोबरच साहित्यातही योगदान दिलं. एका कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
भाजपाच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. वाजपेयी पंतप्रधान असताना आडवाणी यांनी उपपंतप्रधान म्हणून काम पाहिलं. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
दिल्लीत झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लालकृष्ण आडवाणी, सुंदर सिंग, कैलास जोशी यांच्यासह वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
आयएनएस म्हैसूरच्या अनावरण प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी पंतप्रधान वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
संसदेत झालेल्या सर्व पक्षीय बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार एन.डी. तिवारी यांच्यासोबत बाहेर पडताना अटल बिहारी वाजपेयी. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाजपेयींना लालकृष्ण आडवाणी मिठाई भरवताना.. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
(एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
-
२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची १६ ऑगस्ट २०१८ राेजी प्राणज्योत मालवली. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (एक्स्प्रेस अर्काईव्ह फोटो)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”