अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक चव्हाण आघाडीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. काँग्रेसच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांचंही नाव घेतलं जातं दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे तसंच आक्रमक नेते म्हणून धनंजय मुंडे यांना ओळखलं जातं. बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव करत विधानसभा निवडणूक जिंकली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस आमदार अनिल देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनीदेखील आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. २००४ मध्ये धारावीतून त्या सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी आमदार डॉ. राजेंद्र शिंगाणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. १९९९ सालापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. २००४ रोजी महसूल आणि शिक्षण राज्यमंत्रीद त्यांच्याकडे होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नवाब मलिक मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नाव असून पक्षाशी एकनिष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. अल्पसंख्याक समाजातील मोठा चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेपद त्यांनी भूषवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेश टोपे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. १९९९ साली प्रथम आमदार म्हणून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत सलग पाचव्यांदा विजयी झाले. २०१२ साली ऊर्जा खात्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. काँग्रेस आमदार सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग पाचव्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. १९९२ साली ते जिल्हा राजकारणात सक्रीय झाले. १९९५ पासून सावनेर मतदारसंघातून सलग विजयी होत आहेत. काँग्रसेचा विदर्भातील महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग चार वेळा यवतमाळमधून आमदार झाले आहेत. सलग १८ वर्ष शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी ते राहिले. २०१४ साली महसूल राज्यमंत्री त्यांच्याकडे होतं. -
काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र. २००९ साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. २००२ ते २००८ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कराड उत्तर मतदारसंघाचं नेतृत्त्व करणारे बाळासाहेब पाटील पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना आमदार दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा भुसे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना पक्षातील एक मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारच्या काळातही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख. शिवसेना नेते संदिपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पंचायत समितीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात. ग्रामीण भागात त्यांची चांगली पकड आहे. जिल्हा बँकेवर तीन वेळा संचालक म्हणून निवडून आले होते. पहिल्याच प्रयत्नात पैठणमधून निवडून आले. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१९ साली तिसऱ्यांदा आमदार म्हणून त्या निवडणून आल्या. कर्नाटक निवडणुकीत प्रभारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या. शिवेसना आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी झेव्हिअर्स कॉलेजमधून पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी एलएलबीचंही शिक्षण घेतलं आहे. ठाकरे घराण्यातील पहिला आमदार होण्याचा मान आदित्य ठाकरेंनी मिळवला आहे. शिवसेना आमदार अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २००१ साली त्यांची शिवसेना विभाग प्रमुखपदी निवड झाली होती. शिवसेनेच्या कायदेशीर सल्लागार समितीवरही त्यांची निवड झाली होती. २००४ साली प्रथमच विधानसभेवर निवडून आले होते. काँग्रेस आमदार असलम शेख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. १९९९ ते २००४ दरम्यान ते समाजवादी पक्षात होते. २००४ ते २००९ काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. २०१४ मध्ये राम बोराट यांचा त्यांनी पराभव केला. तर २०१९ मध्ये रमेशसिंह ठाकूर यांचा पराभव केला. काँग्रेस आमदार के.सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग सात वेळा आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. १९९५ पासून अक्कलकुवा मतदारसंघाचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आहे. अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ साली पराभव झाल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०१९ साली नेवासा येथून ते अपक्ष निवडून आले. -
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ग्रामपंचायतून सक्रीय राजकारणात प्रवेश करणारे अब्दुल सत्तार २००९ च्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नेते अशी त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्रिपुराचे माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे सुपूत्र. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. १९९२ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. २०१५ मध्ये विधान परिषदेतून पुन्हा विधीमंडळात पोहोचले. शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. १९८६ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. आतापर्यंत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९९२ ते २००२ जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. २००४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून बच्चू कडू निवडून आले. २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा विजयी झाले. आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. रुग्ण तसंच शेतकऱ्यांसाठी अनेकदा आक्रमकपणे ते पुढाकार घेताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ साली राष्ट्रवादीकडून आमदारपदी. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. हावर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली आहे. भारती विद्यापीठाचे ते सचिव आहेत. काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्त्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. २००८ पासून रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. २०१७ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्या निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आजोबा बाबुराव तनपुरे १० वर्ष तर वडील प्रसाद तनपुरे सलग २५ वर्ष आमदार होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. युथ काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. २०१४ साली पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. आर आर पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. २०१९ मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ